IND vs AUS TEST : ऑस्ट्रेलिया सोबत कसोटी सामना, टीम इंडिया नागपुरात दाखल | पुढारी

IND vs AUS TEST : ऑस्ट्रेलिया सोबत कसोटी सामना, टीम इंडिया नागपुरात दाखल

नागपूर : पुढारी वृत्तसेवा- पुढील आठवड्यात नागपुरात होणाऱ्या भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट सामन्यासाठी आज विराट कोहली, के एल राहुल यांच्यासह भारतीय संघातील सदस्य नागपुरात दाखल झाले. व्हीसीएच्या मैदानावर बॉर्डर -गावस्कर चषक कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे.

गेल्या काही दिवसात भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवत असताना कसोटी क्रिकेटमध्ये हे कामगाराला नमविण्याची ही चांगली संधी असल्याने कसून सराव या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. (IND vs AUS TEST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, विराट कोहली याच्या तोंडाला मास्क असल्यामुळे चाहत्यांची आणि कोच राहुल द्रविड यांच्यासह इतर खेळाडू यांनी देखील माध्यमांशी बोलण्यास नकार दिल्याने सर्वांची निराशा झाली. गाड्यांमध्ये बसून सर्वजण हॉटेलकडे रवाना झाले. (IND vs AUS TEST)

Back to top button