प्रशिक्षक नुशीन अल खदीर यांचे 18 वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण

प्रशिक्षक नुशीन अल खदीर यांचे 18 वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण
Published on
Updated on

पहिलावहिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक आणि पहिल्याच स्पर्धेत विजेतेपद पटकावले. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. हा विजय खेळाडूंसाठी खास आहे. पण, ज्या प्रशिक्षकाने त्याला जगज्जेता बनवण्यात सर्वस्व खर्च केले, त्यांच्यासाठी हा विजयही जुनी जखम भरल्यासारखा आहे.

या टी-20 विश्वचषकातील भारतीय महिला अंडर-19 संघाच्या प्रशिक्षक नुशीन अल खदीर यांच्यासाठी हा विजय खूप खास आहे. कारण 18 वर्षांपूर्वी एक खेळाडू म्हणून जे स्वप्न अपूर्ण राहिले. ते आज प्रशिक्षक म्हणून पूर्ण झाले आहे.

नुशीन म्हणाली, राष्ट्रगीतापासून ते चॅम्पियन बनण्यापर्यंत आमच्या शरीरावर काटा उभा राहत होता आणि अभिमानाने भारावल्यासारखे वाटत होते. ही घटना माझ्यासाठी खूप खास होती. नुशीन पुढे म्हणाली, या संघातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास कधीच डगमगलेला नाही. ज्या पद्धतीने संघटित होऊन खेळले ते विलक्षण होते. आम्ही अशा गोष्टी अगदी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न केला. आमची अशी भावना होती की आम्ही ते आमच्या मार्गाने मैलाचा दगड पार करू.

18 वर्षांपूर्वीची वेदना…

अखेर 18 वर्षांपूर्वी जे घडले होते, ज्याची वेदना नुशीन खदीर यांच्या हृदयात अजूनही आहे. 2005 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाशी झाला. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली होती आणि अंतिम सामना सेंच्युरियनमध्ये झाला होता. ऑस्ट्रेलियाने भारताला 216 धावांचे लक्ष्य दिले होते, पण मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 46 षटकांत 117 धावांत गुंडाळला गेला आणि ऑस्ट्रेलियाने 98 धावांनी विजय मिळवून विश्वचषकावर कब्जा केला.

मोदींकडून अभिनंदन

नवी दिल्ली : भारतीय संघाने 19 वर्षांखालील मुलींचा पहिलावहिला टी-20 वर्ल्डकप रविवारी जिंकला. भारताच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत अभिनंदन केले आहे. आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषकामध्ये महिलांनी विजय मिळवल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. त्यांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले आहे आणि तुमचे यश अनेक आगामी क्रिकेटपटूंना प्रेरणा देईल. तसेच संघाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाचा जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले अन् संघाला 5 कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली.

अविश्वसनीय घटना : शेफाली

भारताची कर्णधार शेफाली वर्माने संघाला पाठिंबा दिल्याबद्दल सपोर्ट स्टाफचे कौतुक केले. खेळाडूंनी ज्या प्रकारे कामगिरी केली आणि एकमेकांना पाठिंबा दिला त्यामुळे मी आनंदी आहे. ही एक अविश्वसनीय घटना घडली असून या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. सहायक संघ सदस्यांचे आभार. ज्या प्रकारे ते आम्हाला दररोज पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला सांगत आहेत की आम्ही चषकासाठी येथे आहोत. त्यांच्यामुळेच आम्ही इथे आलो आहोत. मला खेळाडूंचा चांगला पाठिंबा मिळाला. या संघाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. हे विजेतेपद जिंकून खूप आनंद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news