टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल, पृथ्वी शॉला मिळणार संधी? | पुढारी

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल, पृथ्वी शॉला मिळणार संधी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौमध्ये आज (दि. 29) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण पहिल्या सामना गमावला असून दुस-या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यास मालिका गमवावी लागेल. त्यामुळे हा सामना करो या मरो असाच आहे. अशा स्थितीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला वेगवान सुरुवात करून देण्याची जबाबदारी इशान किशनकडे होती, मात्र त्याने निराशा केली आणि तो स्वस्तात बाद झाला. त्याला केवळ चार धावा करता आल्या. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पंड्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पृथ्वी शॉला सलामीला संधी देऊ शकतो. सध्या त्याने रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध देशांतर्गत क्रिकेटमध्ये 379 धावांची खेळी खेळली, जी रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याच्याकडे सलामीचा अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो. पृथ्वी शुभमन गिलचा नवा ओपनिंग पार्टनर बनू शकतो.

पृथ्वी भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने टीम इंडियासाठी 5 कसोटी सामन्यात 339 धावा, 6 वन-डे सामन्यात 189 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो भारतासाठी एक टी-20 सामनाही खेळला आहे. त्याने 63 आयपीएल सामन्यात 1588 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत एका शतकाची नोंद आहे.

दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

पृथ्वी शॉ, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, शिवम मावी, उमरान मलिक, मुकेश कुमार

Back to top button