INDvsNZ 3rd ODI : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय | पुढारी

INDvsNZ 3rd ODI : टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला 386 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने  27 ओव्हर  4  विकेट गमावत 199 धावा केल्या.

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर फिन ऍलन खाते न उघडता बाद झाला. हार्दिक पंड्याने त्याला माघारी धाडले. यावेळी संघाचीही धावसंख्या 0 होती. हार्दिकने या ओव्हरमध्ये तीन वाईड बॉल टाकले. पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर किवी संघ अडचणीत सापडला. पण कॉनवे आणि निकोल्सने संयमी खेळी करून डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली.

न्यूझीलंडला नववा धक्का

280 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची नववी विकेट पडली. युझवेंद्र चहलने जेकब डफीला विकेट्ससमोर पायचीत केले. आता भारतीय संघ विजयापासून एक विकेट दूर आहे. हा सामना जिंकताच टीम इंडिया आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येईल.

न्यूझीलंडला आठवा धक्का

279 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची आठवी विकेट पडली. कुलदीप यादवच्या चेंडूवर कर्णधार रोहितने अप्रतिम झेल घेत लोकी फर्ग्युसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या सामन्यातील कुलदीपने तिसरी विकेट घेतली.

न्यूझीलंडला सातवा धक्का

268 धावांवर न्यूझीलंडची सातवी विकेट पडली. कुलदीप यादवने मायकेल ब्रेसवेलला बाद करून भारताला सातवे यश मिळवून दिले. ब्रेसवेलला मोठा फटका खेळायचा होता, पण कुलदीपने वाइड गोलंदाजी केली. अशा स्थितीत यष्टिरक्षक इशान किशनने ब्रेसवेलचा डाव यष्टिचित करून बाद केले.

न्यूझीलंडला सहावा धक्का

230 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची सहावी विकेट पडली. उमरान मलिकने डेव्हॉन कॉनवेला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. रोहित शर्माने कॉनवेचा कॅच घेतला. त्याने 100 चेंडूत 12 चौकार आणि 8 षटकारांसह 138 धावा केल्या. आता सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल ही जोडी क्रीझवर आहे. याच जोडीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी करत न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

न्यूझीलंडला पाचवा धक्का

न्यूझीलंडचा निम्मा संघ 200 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शार्दुल ठाकूरने ग्लेन फिलिप्सला बाद करून भारताला पाचवे यश मिळवून दिले. या सामन्यातील त्याची ही तिसरी विकेट आहे. ग्लेन फिलिप्सने सात चेंडूत पाच धावा केल्या. शार्दुलने त्याला विराटकरवी झेलबाद केले. डेव्हॉन कॉनवे आणि मायकेल ब्रेसवेल सध्या क्रीजवर आहेत. 28 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 5 बाद 200 आहे.

न्यूझीलंडला चौथा धक्का

184 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची चौथी विकेट पडली. शार्दुल ठाकूरने सलग दोन चेंडूंत विकेट घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर आणले आहे. किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथम आपले खातेही उघडू शकला नाही

न्यूझीलंडला तिसरा धक्का

न्यूझीलंडची तिसरी विकेट 184 धावांच्या धावसंख्येवर पडली. शार्दुल ठाकूरने डेरिल मिशेलला विकेटकीपर किशनकरवी झेलबाद केले

डेव्हन कॉनवेचे शतक

न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने शानदार शतक झळकावले. त्याने 71 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कॉनवे शानदार फलंदाजी करत आहे. त्याने आतापर्यंत सात चौकार आणि सात षटकार मारले आहेत. त्याने डॅरिल मेशेलसोबत अर्धशतकी भागीदारीही केली असून किवी संघ सामन्यात कायम आहे.

न्यूझीलंडला दुसरा धक्का 

सामन्याच्या 40 व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या सहाय्याने दुसरा धक्का दिला. त्याने न्यूझीलंडचा डाव सावरलेला फलंदाज निकोल्सला 42 धावांवर बाद केले.

कॉनवेनेचे अर्धशतक

संघाला पहिला धक्का बसल्यापासून कॉनवे आणि निकोल्स यांनी सावध खेळी करत संघाचा डाव सावरला. यावेळी  कॉनवेने आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच निकोल्सच्या साथीने संघाला 100 धावांचा टप्पा पारकरून दिला.

13 ओव्हरपर्यंत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 1 विकेट गमावत 90 धावा केल्या आहेत.

सामन्यात संयमी फलंदाजी करत न्यूझीलंडचे फलंदाज कॉनवे आणि निकोल्स धावफलक हलता ठेवत आहेत. सामन्याच्या 12 ओव्हरपर्यंत त्यांनी 1 गडी गमावच 85 धावा केल्या.

तत्पूर्वी, टीम इंडियाने दिलेल्या 386 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर फिन ऍलन खाते न उघडता बाद झाला. हार्दिक पंड्याने त्याला माघारी धाडले. यावेळी संघाचीही धावसंख्या 0 होती. हार्दिकने या ओव्हरमध्ये तीन वाईड बॉल टाकले.

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 9 विकेट गमावून 385 धावांचा डोंगर रचला. गिलने 78 चेंडूत 112 तर रोहितने 85 चेंडूत 101 धावा केल्या. या दोघांशिवाय हार्दिक पांड्यानेही शेवटच्या षटकांमध्ये तडाखेबाज फलंदाजी करून 38 चेंडूत 54 धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी 3-3 बळी घेतले.

26 षटकांत भारताची धावसंख्या विकेट न गमावता 212 धावा होती. त्यानंतर रोहित आऊट झाला. काही वेळाने शुभमन गिलही पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहली (36), इशान किशन (17) आणि सूर्यकुमार यादव (14) हे मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. हार्दिक आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी 54 धावा जोडून भारताला पुन्हा रुळावर आणले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाने यापूर्वी किवींविरुद्ध 8 मार्च 2009 रोजी ख्राइस्टचर्चमध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली होती. त्यावेळी भारताने 50 षटकांत 4 गडी गमावून 392 धावा केल्या होत्या.

पाहुण्या न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात 2 बदल करण्यात आले, तर न्यूझीलंडने एक बदल केला. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी उमरान मलिक आणि युझवेंद्र चहलला स्थान देण्यात आले. त्याचवेळी किवी कर्णधार टॉम लॅथमने शिपलेच्या जागी डफीचा समावेश केला. (IND VS NZ 3rd ODI)

रोहित-गिलने दमदार सुरुवात करून दिली

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी 157 चेंडूत 212 धावांची सलामी दिली. रोहितने एकदिवसीय कारकिर्दीतील 30 वे शतक झळकावले. तर गिलने आपले चौथे शतक पूर्ण केले.गिलचे गेल्या चार सामन्यांतील तिसरे शतक आहे. कर्णधार रोहितच्या बॅटमधून तीन वर्षांनंतर वनडे शतक झळकले. 2019 नंतर भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी शतके झळकावली आहेत. यापूर्वी रोहित आणि राहुलने ही कामगिरी केली होती.

पूर्णवेळ सलामीवीर म्हणून रोहितने 10 वर्षे पूर्ण

भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पूर्णवेळ सलामीवीर म्हणून 10 वर्षे पूर्ण केली. डावाची सुरुवात करताना त्याने 55.93 च्या सरासरीने आणि 92.71 च्या स्ट्राईक रेटने 7663 धावा केल्या आहेत.

भारताचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमरान मलिक

न्यूझीलंडचा संघ :

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ब्लेअर टिकनर

Back to top button