Elena Rybakina : सुरुवातीपासून आक्रमक खेळल्यामुळे जिंकले : एलेना रिबाकीना

Elena Rybakina : सुरुवातीपासून आक्रमक खेळल्यामुळे जिंकले : एलेना रिबाकीना

अव्वल प्रथम मानांकित इगा स्विआटेकला ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाद करून मेलबर्न पार्क येथे टेनिस भूकंप घडवून उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या कझाकिस्तानच्या एलेना रिबाकीनाने विजयानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीशी वार्तालाप साधला. (Elena Rybakina)

एलेना म्हणाली, जगातील नं 1 खेळाडू विरुद्ध खेळताना गमावण्यासाठी काहीच नसते. अगदी प्रारंभापासून मी इगावर आक्रमण केले. कारण ती चपळ आहे याची मला जाणीव होती. माझ्या सर्व्हिसेस तुफान वेगवान झाल्या तेच माझे मुख्य अस्त्र ठरले. विम्बल्डननंतर मी बराच अनुभव घेऊन खेळात प्रयोग आणि बदल केले आहेत त्याचा फायदा होतोय. एलेना पुढे म्हणाली, मला अजून सुधारण्याला वाव आहे. चांगले सातत्य राहिल्यास मी जगातील अव्वल खेळाडू होऊ शकेन आणि कोणालाही हरवेन याचा विश्वास वाटतो. प्रत्येक सामन्यानंतर मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करते आणि खेळते ते सामना जिंकण्याच्या जिद्दीनेच मैदानात उतरते, अशी पुस्तीही तिने जोडली. (Elena Rybakina)

प्रथम मानांकित इगा स्विआटेक म्हणाली, माझ्या कमकुवत सर्व्हिसेसनी घात केला. एलेनाने माझ्यावर प्रचंड दडपण ठेवले. निश्चितच खेळाचे अवलोकन करून मला सुधारणा, बदल करावे लागतील. तीने निश्चितच सर्वोत्तम खेळ करून मला निष्प्रभ केले. अन्य सामन्यांत सानिया मिर्झाचे दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीआधीच संपुष्टात आले.

रविवारी खरे टेनिस युद्ध हुबर्ट हरकाझ आणि सबेस्टीयन कॉर्डा यांच्यात पाहायला मिळाले. हा सामना अतिशय अटीतटीचा होऊन 3 तास 28 मिनिटांनी 5 सेट नंतर सबेस्टीयन कॉर्डा याने विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. महिला गटातील तृतीय मानांकित जेसीका पेगुलाने अपेक्षेप्रमाणे बार्बोरा क्रेजिकोवाला धूळ चारून उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असल्याने अधिक बहारदार आणि रोमहर्षक टेनिस पाहायला मिळेल.

थेट ऑस्ट्रेलियातून : उदय बिनीवाले

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news