ICC ODI Rankings : भारताने न्यूझीलंडला हरवले, पण इंग्लंडने मारली बाजी | पुढारी

ICC ODI Rankings : भारताने न्यूझीलंडला हरवले, पण इंग्लंडने मारली बाजी

पुढारी ऑनलाईन डेस्क : रायपूर येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. यामुळे आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली. भारताकडून या पराभवानंतर न्यूझीलंडला क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावरून पायउतार व्हावे लागले आहे. शनिवारी (दि. 22) सामना गमावल्यानंतर किवी संघ एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरले. मात्र, टीम इंडियाला विजय मिळवूनही क्रमवारीत फरक पडलेला नाही आणि ते तिस-या स्थानी आले आहेत.

भारताच्या विजयाने क्रमवारीत बदल

हैदराबादमध्ये भारताविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 12 धावांनी गमावल्यानंतर, रायपूरमधील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने न्यूझीलंडला दुहेरी धक्का बसला आहे. किवींनी केवळ तीन सामन्यांची मालिका गमावली नाही तर एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थानही गमावले. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड 115 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकाचा वनडे संघ होता. इंग्लंडचा संघ 113 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 112 गुण होते आणि ते तिसऱ्या स्थानावर होते, तर भारत 111 गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता.

भारत जिंकला, पण इंग्लंड सिकंदर

भारताकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडच्या खात्यात 113 रेटिंग गुण आणि एकूण 3166 गुण आहेत आणि ते दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. भारताच्या विजयाचा सर्वाधिक फायदा इंग्लंडला झाला. न्यूझीलंड आणि भारताप्रमाणे त्याच्या खात्यात 113 गुण असले तरी एकूण गुणांमुळे इंग्लंड पहिल्या क्रमांकाचा संघ बनला आहे.

नंबर 1 बनण्याची भारताला संधी

न्यूझीलंडविरुद्धचा मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वन-डे सामना जिंकला टीम इंडिया इंग्लंडला नक्कीच मागे टाकेल. म्हणजेच पुढील तीन 15 दिवसांत भारताला वन-डेतील नंबर 1 संघ बनण्याची सुवर्णसंधी आहे.

Back to top button