Rohit Sharma Sixer King : रोहितने मोडला धोनीचा विक्रम! बनला भारतातील नवा सिक्सर किंग

Rohit Sharma Sixer King : रोहितने मोडला धोनीचा विक्रम! बनला भारतातील नवा सिक्सर किंग
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Sixer King : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सामन्यात एक विशेष कामगिरी नोंदवली. त्याने वन-डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. धोनी भारतात सर्वाधिक षटकार मारण्यात (123) आघाडीवर होता, पण आता हिटमॅन रोहित भारतातील वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत पुढे गेला आहे.

भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार रोहितने 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. रोहितने हेन्री शिपलेला तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पहिला षटकार मारला आणि यासह त्याने धोनीचा विक्रमही मोडला. त्याचबरोबर या सामन्यात दोन षटकारांसह आता रोहितच्या नावावर भारतातील वनडेमध्ये 125 षटकारांची नोंद झाली आहे. (Rohit Sharma Sixer King)

भारतातील वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज (Rohit Sharma Sixer King)

रोहित शर्मा – 125
एमएस धोनी – 123
सचिन तेंडुलकर – 71
विराट कोहली – 66
युवराज सिंग – 65

उल्लेखनीय म्हणजे, वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे, त्याने 239 एकदिवसीय सामन्यांमध्ये 265 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचे नाव अग्रस्थानी आहे. त्याने 398 सामन्यात 351 षटकार मारले आहेत.

एकूण वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

शाहिद आफ्रिदी – 351 (398 सामने)
ख्रिस गेल – 331 (301 सामने)
सनथ जयसूर्या – 270 (445 सामने)
रोहित शर्मा – 265 (239 सामने)
एमएस धोनी – 229 (350 सामने)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news