Ind vs SL 3rd ODI : वनडमध्ये भारताचा विश्वविक्रमी ऐतिहासिक विजय; श्रीलंकेला तब्बल ३१७ धावांनी चारली धूळ | पुढारी

Ind vs SL 3rd ODI : वनडमध्ये भारताचा विश्वविक्रमी ऐतिहासिक विजय; श्रीलंकेला तब्बल ३१७ धावांनी चारली धूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. विराट कोहली आणि शुभमन गिलची शतकी खेळी आणि मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने हा विजय संपादन केला. एकदिवसीय सामन्यांतील हा भारताचा सर्वांत मोठा विजय आहे. भारताने श्रीलंकेवर तब्बल ३१७ धावांनी विजय मिळवला. हा सामना तिरूवनंतरपुरमच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. (Ind vs SL 3rd ODI)

श्रीलंकेवर आजवरचा सर्वांत मोठा विजय (Ind vs SL 3rd ODI)

भारताने रविवारी मिळवलेला विजय एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील सर्वांत मोठा विजय आहे. यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्युझीलंडच्या संघाने आयर्लंडचा २९० धावांनी पराभव केला होता. (Ind vs SL 3rd ODI) तर ऑस्ट्रेलियानेही २०१५ अफगानिस्तानच्या संघावर २७५ धावांनी मात केली होती. भारताने यापूर्वी २००७ मध्ये भारताने बरमुडा या संघाचा २५७ धावांनी धुव्वा उडवला होता. (Ind vs SL 3rd ODI)

विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. विराट आणि शुभमनने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ३९० धावांचा डोंगर उभा करत श्रीलंकेसमोर ३९१ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ फक्त ७३ धावाच करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराजने ४ विकेट्स पटकावल्या. तर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. (Ind vs SL 3rd ODI)

आजच्या सामन्यात विराट कोहलीने आपले ४६ वे शतक ठोकले. त्याने ११० चेंडूमध्ये १६६ धावांची खेळी केली. या शतकानंतर विराट कोहली सचिनचा एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम मोडण्यापासून फक्त ४ शतके दूर आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकं ठोकली आहेत. त्यामुळे विराट सचिनचा विक्रम कधी मोडणार? याकडे चाहत्यांचे लक्ष्य आहे. (Ind vs SL 3rd ODI)

हेही वाचंलत का?

Back to top button