हॉकी वर्ल्डकप फायनलमध्ये रणवीर सिंग थिरकणार

हॉकी वर्ल्डकप फायनलमध्ये रणवीर सिंग थिरकणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हॉकी विश्वचषक 2023 हे 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 जानेवारीला होणार आहे. या उद्घाटन समारंभात बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आपल्या बिनधास्त डान्सने कार्यक्रमात रंगत आणणार आहे.

भारत या स्पर्धेच्या 15 व्या आवृत्तीचे यजमानपद भूषवत आहे. 2018 मध्येही भारताने विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते आणि यावेळीही भारत सलग दुसर्‍यांदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे.

भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राऊरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 16 संघांच्या या स्पर्धेत एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. राऊरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आहे. या स्पर्धेत एकूण 288 हॉकीपटू आपले कौशल्य दाखवतील. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 जानेवारीला होणार आहे. या उद्घाटन समारंभात बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आपल्या बिनधास्त डान्सने कार्यक्रमात रंगत आणणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news