पाकिस्तानी क्रिकेटपटूंना ऋषभची काळजी : म्हणाले," गेट वेल सून..." | पुढारी

पाकिस्तानी क्रिकेटपटूंना ऋषभची काळजी : म्हणाले," गेट वेल सून..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी (दि.३०) पहाटे अपघात झाला. दिल्लीवरून उत्तराखंडच्या रूरकी येथे जाताना ही दुर्घटना घडली होती. यामध्‍ये ऋषभगंभीर जखमी झाला. त्‍याचावर  डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देशभरातील क्रिकेट चाहत्‍यांकडून ऋषभ पंतसाठी प्रार्थना करण्‍यात येत आहे. आता पाकिस्‍तानमधील क्रिकेटपटूंनी ऋषभच्‍या प्रकृतीबाबत काळजी व्‍यक्‍त केली आहे. पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंनी ऋषभ लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.  (Rishabh Accident And Pakistan Cricketer’s Reaction)

पाकिस्तानचा खेळाडू शादाब खान ट्वीटमध्‍ये म्‍हटलं आहे की, “मी ऋषभ पंतसाठी प्रार्थना करतो.” शोएब मलिकने म्‍हटलं आहे की, ऋषभ पंतच्या अपघाताबद्दल माहिती मिळाली. मी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे.”

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने ट्वीट करत ऋषभ बाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याने ट्वीट करताना म्हटले की, ऋषभ लवकर बरा व्हावा, यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. (Rishabh Accident And Pakistan Cricketer’s Reaction)

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभवर डेहराडूनमधील मॅक्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्‍याच्‍या गुडघ्याला, डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. (Rishabh Accident And Pakistan Cricketer’s Reaction)

हेही वाचलंत का?

Back to top button