पुढारी ऑनलाईन डेस्क : यावर्षी होणार्या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी २० खेळाडूंची शॉर्टलिस्ट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) काढली आहे. या यादीवर 'बीसीसीआय' विचार करत असून, यातूनच अंतिम १५ खेळाडूंच्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. बीसीआयने आयोजित केलेल्या या बैठकीत भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याता आला. तसेच २०२३ चा वनडे विश्वचषक आणि वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपसाठी काय निर्णय घेता येतील? याबाबतही विचारमंथन झाले.
वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंचे रोटेशन करण्यात येईल, असा निर्णय 'बीसीसीआय'ने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यंदाची वनडे विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. या बैठकीसाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा उपस्थित होते. तसेच या बैठकीला 'बीसीसीआय'चे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. (World Cup 2023 BCCI shortlists)
१. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देण्यात येईल.
२. इमर्जिंग खेळाडूंना भारतात खेळवल्या जाणाऱ्या मालिकेत निवड करण्यात येईल. त्याच्या आधारेच खेळाडूंची भारताच्या मुख्य संघात निवड करण्यात येईल.
३. एकदिवसीय विश्वचषक २०२३ आणि उर्वरित मालिकांसाठी 'एनसीए' आयपीएलच्या फ्रेंचाइजीसोबत बातचीत करेल. तसेच खेळाडूंवर येणाऱ्या वर्कलोडचेही व्यवस्थापन करण्यात येईल.