विराटने कर्णधारपद सोडावे; शास्त्रींनी सहा महिन्यापूर्वीच दिला होता सल्ला | पुढारी

विराटने कर्णधारपद सोडावे; शास्त्रींनी सहा महिन्यापूर्वीच दिला होता सल्ला

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताचा कर्णधार विराट कोहलीने टी२० वर्ल्डकपनंतर टी२० कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच या घोषणेची पार्श्वभूमी शोधणारी पाने पलटली जाऊ लागली. आता विराटने कर्णधारपद सोडावे असा सल्ला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सहा महिन्यापूर्वीच दिला होता अशी एक स्टोरी समोर येत आहे. विराटने आता आपल्या फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रीत करावे असे शास्त्रींना वाटत होते.

विराट कोहलीने २०१७ मध्ये तीनही संघांचे कर्णधारपद स्विकारले होते. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली होती.

विराटने कर्णधारपद सोडावे अशी चर्चा ज्यावेळी अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात विराटविना आणि प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही मालिका जिंकली होती त्यावेळी सुरू झाली. त्यानंतर जवळपास सहा महिन्यापूर्वी रवी शास्त्री यांनी विराटने कर्णधारपद सोडावे याबबात त्याच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी विराटने त्यांना फार काही गाभिऱ्यांने घेतलने नव्हते. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधारपद कायम ठेवले आहे.

तर विराटला एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोडावे लागेल

पण, बीसीसीआयच्या सूत्रांचे वक्तव्य जर २०२३ च्या पूर्वी योजनेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर विराट कोहली एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोडेल याकडे बोट दाखवते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे विराट कोहली अजूनही एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्यास इच्छुक आहे. त्यामुळेच विराटने सध्यातरी टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे.

बीसीसीआय विराट कोहलीचा एक चांगला फलंदाज म्हणून कशा प्रकारे वापर करुन घेता येईल याचा विचार करत आहे. एक खेळाडू म्हणून विराट कोहली अजूनही दमदार कमगिरी करु शकतो. असे असले तरी विराट कोहलीने बऱ्याच काळापासून शतक ठोकलेले नाही.

विराटने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून शास्त्रींचा एकदिवसीय संघाचे विराटने कर्णधारपद सोडावे हा सल्ला ऐकला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विराटसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील येणारे दिवस हे आव्हानात्मक असणार आहेत. आता विराटला फक्त भारताला विजय मिळवून द्यायचा नाही तर फलंदाजीतही दमदार कामगिरी करायची आहे.

Back to top button