Pele Dies at 82 : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन

Pele Dies at 82 : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन
Published on
Updated on

साओ पाउलो; पुढारी ऑनलाईन : ब्राझीलचे दिग्गज आणि महान फुटबॉल पटू पेले यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन झाले. पेले यांचे जगभरात मोठे नाव होते. एक महान फुटबॉलपटू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी ब्राझीलला तीन वेळा फुटबॉल विश्वचषक मिळवून दिले होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. आपल्या अखेरच्या काळात सुद्धा ते ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना तब्बेतीच्या चढ उताराबाबत कळवत होते. अखेर या दिग्गज फुटबॉलपटूची झूंज अपयशी ठरली आणि गुरुवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. (Pele Dies at 82)

फुटबॉलमधील सर्वकालीन महान पेले यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर साओ पाउलोच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटोही यांनी अधिकृतपणे पेले यांचे निधन झाले असल्याची माहिती माध्यमांना दिली. (Pele Dies at 82)

पेले यांच्या कोलनमधून सप्टेंबर २०२१ मध्ये टयुमर काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांची तब्बेत वारंवार बिघडत चालली होती. गेल्या काहीदिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. कॅन्सरमुळे त्यांच्या किडनी आणि ह्रदयावरही परिणाम झाला होता. हळूहळू त्यांचे अवयव निकामी होत चालले होते. फुटबॉल विश्वचषकावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा अवघ्या जगाने त्यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना केली होती. त्यानंतर त्यांनी ट्वीटरवरुन आपली तब्बते ठिक असल्याच बातमी तमाम फूटबॉल चाहत्यांना दिली होती. तसेच ट्वीटरच्या माध्यमातून ते आपल्या तब्बेतीची माहिती देत होते.

ब्राझीलला तीनवेळा विश्वचषक जिंकून दिला

पेले यांनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. 1958 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांनी दोन गोल मारले होते. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळत  एकूण 1281 गोल झळकावले होते. ब्राझीलसाठी त्यांनी 91 सामने खेळले असून एकूण 77 गोल केले आहेत. फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेत्या अर्जेंटिनाचं त्यांनी अभिनंदन केलं होतं. तसेच लियोनेल मेस्सी विजयाचा खरा हिरो असल्याचं सांगत कौतुक केलं होतं.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news