IPL 2023 : आयपीएलचा हंगाम एक आठवड्याने लांबणीवर? | पुढारी

IPL 2023 : आयपीएलचा हंगाम एक आठवड्याने लांबणीवर?

मुंबई, वृत्तसंस्था : आयपीएलचा (IPL 2023) 16 वा हंगाम बीसीसीआयने जवळपास एक आठवडा पुढे ढकलला असून ही स्पर्धा आता 23 मार्चऐवजी 1 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने आयपीएलमधील फ्रँचाईझींनी आयपीएल 2023 ची संभाव्य तारीख कळवली आहे. याबाबतच्या माहितीला दोन फ्रँचाईझींनी दुजोरा दिला आहे. या फ्रँचाईझींनी सांगितले की, आयपीएल 2023 जवळपास एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. बीसीसीआयने आयपीएल फ्रँचाईझींनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा 16 वा हंगाम 1 एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. याआधी आयपीएलचा यंदाचा हंगाम हा मार्चमध्ये सुरू होणार होता.

बीसीसीआयने आयपीएल 2023 (IPL 2023) चा हंगाम एक आठवडा पुढे ढकलण्याचे कारण हे महिला आयपीएलचा पहिला हंगाम आहे. महिला आयपीएल 3 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिलाच आयपीएल 2023 चा हंगाम हा 23 दिवसांचा असेल. याचा अंतिम सामना हा 26 मार्चला खेळवला जाईल. त्यामुळेच आयपीएलचा 16 वा हंगाम हा 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

महिला आयपीएल ही टी-20 महिला वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यानंतर बरोबर एका आठवड्याने सुरू होणार आहे. महिला टी-20 वर्ल्डकपची फायनल ही केपटाऊन येथे 26 फेब्रुवारीला होणार आहे.

Back to top button