Arjun Tendulkar Fail : अर्जुन तेंडुलकर दुस-या रणजी सामन्यात फुस्स! एक धाव करून बाद

Arjun Tendulkar Fail : अर्जुन तेंडुलकर दुस-या रणजी सामन्यात फुस्स! एक धाव करून बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : Arjun Tendulkar Fail : रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये गोवा आणि झारखंड यांच्यात एलिट ग्रुप सी सामना खेळला जात आहे. जमशेदपूरच्या कीनन स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून झारखंडने पहिल्या डावात 386 धावा केल्या. हा सामना गोव्याकडून खेळणारा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनसाठी आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. पदार्पणाच्या रणजी सामन्यात शतक झळकावणाऱ्या अर्जुनला झारखंडविरुद्धच्या सामन्यात बॅट आणि बॉलने लक्षवेधी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीदरम्यान 26 षटकांत 90 धावा देऊन एक बळी घेणारा अर्जुन फलंदाजीत फेल झाला. फलंदाजी क्रमवारीत बढती मिळूनही तो केवळ एक धाव करून बाद झाला.

या आधीच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात अर्जुनने (Arjun Tendulkar Fail) सातव्या क्रमांकावर फलंदाजी उतरत 120 धावांची शानदार खेळी साकारली होती. त्याने 207 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने प्रदार्पणाच्या रणजी सामन्यात शतक झळकावून वडील सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणेच पराक्रम गाजवला होता. तसेच गोलंदाजीतही त्याने तीन विकेट्सही घेतल्या. दरम्यान, अर्जुनच्या या दमदार बॅटींगची दखल घेत त्याला झारखंडविरुद्धच्या फलंदाजी क्रमवरीत बढती देण्यात आली. मात्र, या सामन्यात त्याला 14 चेंडूत केवळ एक धाव काढता आली. अर्जुनला झारखंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही आणि शाहबाज नदीमच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.

दर्शन मिसाळने 4 बळी घेतले

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर झारखंडने गोव्याविरुद्ध 386 धावा केल्या होत्या. कुमार कुशाग्रने सर्वाधिक 96 धावा केल्या. गोव्यासाठी कर्णधार दर्शन मिसाळने 33.1 षटकात 68 धावा देत 4 बळी घेतले. मोहित रेडकरने तीन तर लक्ष्य गर्गने दोन गडी बाद केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news