IND vs BAN : बांगला देशचा कसोटी संघ जाहीर

IND vs BAN : बांगला देशचा कसोटी संघ जाहीर

ढाका, वृत्तसंस्था : वन-डे मालिकेनंतर भारत-बांगला देश (IND vs BAN) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, जी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बांगला देशने 14 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीसाठी आज संघ जाहीर केला.

बांगला देशने वन-डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे आणि भारताविरुद्धचा अखेरचा वन-डे सामना शनिवारी (दि. 10) होणार आहे. पण, बांगला देशने घरच्या मैदानावर ज्याप्रकारे वर्चस्व गाजवले आहे, ते पाहता भारताला कसोटी मालिका सोपी नक्कीच जाणार नाही. त्यात रोहित शर्माच्या खेळण्यावरही अनिश्चितता आहे.

दुसर्‍या वन-डे सामन्यात रोहितला दुखापत झाली आणि तो मुंबईला परतला. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर रोहित पुढील निर्णय घेईल. मोहम्मद शमी, ऋषभ पंत यांचेही कसोटी मालिकेत खेळणे अवघडच आहे. बांगला देशने 14 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीसाठी आज संघ जाहीर केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारत आघाडीवर आहे.

सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताला आणखी सहा सामने खेळायचे आहेत. बांगला देश दौर्‍यावर दोन कसोटी सामने होतील, त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने खेळायला भारत दौर्‍यावर येईल. सध्या, भारत 52.08 टक्केवारीसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका 53.33 च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसर्‍या स्थानावर आहे.

बांगला देशचा कसोटी संघ (पहिल्या सामन्यासाठी) : महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल, जाकारी होसैन, यासीर अली, मुशफिकर रहिम, शाकिब अल हसन, लिटन दास, सोहन, मेहदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक.

भारताचा कसोटी संघ : लोकेश राहुल, आर. अश्विन, के. एस. भरत, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, ऋषभ पंत, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, उमेश यादव.

कसोटी मालिका (IND vs BAN)

पहिली कसोटी : 14 ते 18 डिसेंबर, चत्तोग्राम
दुसरी कसोटी : 22 ते 26 डिसेंबर, ढाका
कसोटीचे सामने सकाळी 9 पासून खेळवण्यात येतील. सोनी स्पोर्टस्वर ही मालिका पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news