FIFA World Cup 2022 : पोर्तुगालचा षटकार, उपांत्यपूर्व फेरीत दाखल | पुढारी

FIFA World Cup 2022 : पोर्तुगालचा षटकार, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

दोहा : गॉनक्लो रामोसच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा 6-1 असा धुव्वा उडवून फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

राऊंड-16 च्या शेवटच्या सामन्यात मंगळवारी पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंड यांची लढत झाली. पोर्तुगालचा संघ ख्रिस्तियानो रोनाल्डोशिवाय मैदानात उतरला; पण रामोसने त्याची उणीव भासू दिली नाही. त्याने 17, 51 आणि 67 व्या मिनिटाला गोल करून हॅट्ट्रिक साधली. त्याच्याशिवाय पेपे (33 वे मिनिट), गुरेरिओ (55 वे मिनिट) तर यांनी लिओने (90+2) पोर्तुगालसाठी गोल केले. स्वित्झर्लंडचा एकमेव गोल मॅन्युएल अ‍ॅकान्झीने केला. पोर्तुगाल आता मोरोक्कोशी भिडणार आहे.

Back to top button