FIFA WC Japan Vs Croatia : पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा जपानवर ३ -१ फरकाने विजय | पुढारी

FIFA WC Japan Vs Croatia : पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा जपानवर ३ -१ फरकाने विजय

दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : फूटबॉल विश्वचषकातील राऊंड ऑफ १६ फेरीतील जपान विरुद्ध क्रोएशिया हा सामना कतारमधील अल जनौब या मैदानावर खेळविण्यात आला. हा सामना निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी १ -१ गोल केल्याने सामना पेनल्टी शूटऑऊटमध्ये गेला. या पेनल्टी शूटऑऊटमध्ये क्रोएशियाने जपानला ३ – १ फरकाने पराभूत केले. जपानला पराभूत करत क्रोएशिया आता तेथ उपात्यंपूर्व फेरीत पोहचला आहे. (FIFA WC Japan Vs Croatia)

ग्रुप स्टेजमध्ये जपानने स्पेन आणि जर्मनी सारख्या बलाढ्य संघाला नमवत ग्रुपमध्ये अव्वल रहात राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला होता. तर दुसरीकडे क्रोएशियाने आपल्या ग्रुपमध्ये १ जिंकून व दोन सामाने बरोबरी राखून दुसरे स्थान प्राप्त केले होते. दोन्ही संघ सोमवारी उपात्यंपूर्व फेरीत दाखल होण्यासाठी एकमेकांशी भिडले. अखेर पर्यंत एकमेकांना तोडीस तोड देत सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला अन अखेर क्रोएशियाने ३ -१ फरकाने जपानला पराभूत केले. अशा प्रकारे या ठिकाणी यंदाच्या विश्वचषकातील जपानचा प्रवास येथेच थांबला आहे. (FIFA WC Japan Vs Croatia)

पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाकडून शॉट घेण्यासाठी आलेल्या व्लासिक, ब्रोझोविक आणि पासालिक यांनी गोल केले. त्याचवेळी लिवाजा यशस्वी गोल करण्यास चुकला. त्याचवेळी जपानकडून असानोला यालाच गोल डागता आला.मिनामिनो, मिटोमा आणि योशिदा हे गोल करण्यात हुकले. शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा गोलरक्षक लिव्हकोविकने तीन गोल सेव्ह केले. (FIFA WC Japan Vs Croatia)

तत्पूर्वी पूर्णवेळपर्यंत १-१ अशी दोन्ही संघानी बरोबरी केली होती. 43व्या मिनिटाला जपानसाठी डेझेन मायदाने गोल केला. त्याचवेळी 55व्या मिनिटाला इव्हान पेरिसिकने क्रोएशियासाठी बरोबरी साधली. यानंतर सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. तेथेही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला.

पेनल्टी शूटआऊटमध्ये काय झालं?

  • पहिला शॉट घेण्यासाठी जपानचा ताकुमी मिनामिनो आला. मात्र, त्याचा फटका क्रोएशियन गोलरक्षक लिव्हकोविचने वाचवला.
  • यानंतर क्रोएशियाकडून निकोला व्लासिकने गोल केला.
  • जपानच्या कौरो मितोमाचा फटका चुकला. त्याचा फटका लिवाकोविचने रोखला.
  • त्यानंतर क्रोएशियाच्या ब्रोझोविकने गोल करत शूटआऊटमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली.
  • जपानच्या ताकुमा असानोने गोल करून 2-1 अशी बरोबरी साधली.
  • त्यानंतर क्रोएशियाचा मार्को लिवाजा हुकला, त्याला जपानी गोलरक्षक गोंडाने शानदारपणे वाचवले.
  • जपानकडून चौथा शॉट घेण्यासाठी कर्णधार माया योशिदा आली, पण तिचा फटकाही क्रोएशियन गोलकीपरने रोखला.
  • यानंतर मारियो पासालिचने गोल करत आपल्या संघाला पुढील फेरीत नेले.


अधिक वाचा :

 

Back to top button