2024 चा टी-20 वर्ल्डकप :  20 संघांचा सहभाग | पुढारी

2024 चा टी-20 वर्ल्डकप :  20 संघांचा सहभाग

दुबई : 2024 मध्ये अमेरिका/वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार्‍या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध लागले आहेत. नवीन ठिकाणी होणार्‍या त्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत नवीन फॉरमॅटही पाहायला मिळणार आहे. अमेरिकेत प्रथमच टी-20 वर्ल्डकप होणार आहे आणि या स्पर्धेत 20 संघ सहभाग घेणार आहेत. त्यामुळे हे दोन संघ आधीच पात्र ठरले आहेत.

त्यात 2022 च्या वर्ल्डकप स्पर्धेतील अव्वल 8 संघही पुढील स्पर्धेत थेट पात्र ठरले. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड यांनी 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे. अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी आयसीसी रँकिंगनुसार थेट प्रवेश पक्का केला.

     जाणून घ्या नवीन फॉरमॅट

  • 20 संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा बाद फेरीपूर्वी दोन टप्प्यांत खेळवली जाणार आहे.
  •  2021 व 2022 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिला राऊंड/सुपर 12 असा फॉरमॅट होता.
  • 2024 च्या वर्ल्डकप स्पर्धेत 20 संघांची चार गटांत विभागणी होणार आहे.
  •  या चार गटातील अव्वल दोन संघ सुपर 8 मध्ये एकमेकांशी खेळतील.
  •  सुपर 8 मध्ये दोन गटांत संघांची विभागणी असेल आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील.

Back to top button