नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पुढील वर्षी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौर्यावर येणार आहे. भारत-ऑस्ट्रलिया मालिका, (IND vs AUS) ज्याला बॉर्डर-गावसकर करंडक म्हणूनही ओळखले जाते. पुढील वर्षी फेब—ुवारी-मार्चमध्ये प्रस्तावित आहे. बीसीसीआयने, तारखा आणि यजमान शहर अद्याप जाहीर केलेले नाही. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय होऊ शकतो.
मात्र, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम (IND vs AUS) चारपैकी एका कसोटी सामन्याचे आयोजन करू शकते. असे झाल्यास अरुण जेटली स्टेडियम पाच वर्षांनंतर कसोटी सामन्याचे आयोजन करेन. ऑस्टे्रलिया आणि भारत यांच्यातील ही मालिका चार सामन्यांची असून त्यातील एक सामना दिल्लीत खेळला जाईल. राहिलेले तीन सामने अहमदाबाद, धर्मशाला आणि चेन्नई याठिकाणी खेळले जाण्याची पूर्ण शक्यता सांगितली गेली आहे.
दिल्लीमध्ये 2017 साली शेवटचा खेळला गेला होता. कसोटी सामना बीसीसीआयच्या रोटेशन पॉलिसीनुसार, दिल्लीला एका कसोटी सामन्याचे यजमानपद मिळेल, कारण कोव्हिड दरम्यान येथे एकही सामना खेळला गेला नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यात डिसेंबर 2017 मध्ये येथे शेवटचा कसोटी सामना खेळला गेला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी दिवस-रात्र होणार की नाही हे अजून ठरलेले नाही.