IPL 2023 : धोनीच्या ‘या’ खास अष्टपैलू खेळाडूला CSK ने दाखवला बाहेरचा रस्ता

IPL 2023 : धोनीच्या ‘या’ खास अष्टपैलू खेळाडूला CSK ने दाखवला बाहेरचा रस्ता
Published on
Updated on

मुंबई, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) आगामी हंगामासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. डिसेंबरमध्ये होणार्‍या मिनी लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींनी त्यांची राखीव यादी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे सादर केली आहे. यात दहा फ्रँचायझींनी मिळून एकूण 81 जणांना रिलिज केले आहे. यातील काही खेळाडू मिनी लिलावासाठी पुन्हा उपलब्ध असतील तर काही खेळाडूंनी व्यस्त वेळापत्रकामुळे आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार गोलंदाज पॅट कमिन्स आगामी हंगामात खेळताना दिसणार नाही, तर किरॉन पोलार्डने मुंबईने रिलिज केल्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे दोन फ्रँचायझींनी आगामी हंगामापूर्वी त्यांच्या कर्णधारांना सोडले आहे. सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला संघातून सोडले आहे, तर मयंक अग्रवालला पंजाब किंग्जने सोडले आहे. सीएसकेने ड्वेन ब्राव्होला सोडले आहे.

चेन्नईने आठ खेळाडूंना सोडले (IPL 2023)

चेन्नईने आठ खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अ‍ॅडम मिल्ने, हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीसन यांचा समावेश आहे. रवींद्र जडेजाला कायम ठेवण्यात आले असून तो पुन्हा एकदा चेन्नईच्या जर्सीत दिसणार आहे.

मुंबईने पाच परदेशींसह 13 खेळाडूंना सोडले (IPL 2023)

मुंबई इंडियन्सने पाच परदेशी खेळाडूंसह 13 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बेसिल थम्पी, डॅनियल सॅम्स, फॅबियन अ‍ॅलन, जयदेव उनाडकट, किरॉन पोलार्ड, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स यांचा समावेश आहे. त्यांच्या पर्समध्ये 20.55 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि नऊ स्लॉट रिकामे आहेत.

गुजरातने सोडले सहा खेळाडू

आयपीएल चॅम्पियन गुजरात टायटन्सने सहा खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग, जेसन रॉय, वरुण आरोन यांचा समावेश आहे.

पंजाबने नऊ खेळाडूंना सोडले

पंजाबने नऊ खेळाडूंना सोडले आहे. कर्णधार मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, हृतिक चॅटर्जी यांचा समावेश आहे. यावर्षी शिखर धवन पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पंजाबने ट्रेव्हर बेलिस यांची नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

हैदराबादने 12 खेळाडूंना सोडले

सनरायझर्स हैदराबादने 12 खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये कर्णधार केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन अ‍ॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद यांचा समावेश आहे.

कोलकाताने सर्वाधिक 16 खेळाडू सोडले

कोलकाता नाईट रायडर्सने 16 खेळाडूंना सोडले. पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, अ‍ॅरॉन फिंच, अ‍ॅलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, रसिक हॅटस् ऑफ, शेल्डन जॅक्सनचा, प्रथम सिंग, रमेश कुमार हे 16 खेळाडू सोडले आहेत.

राजस्थानने नऊ खेळाडूंना सोडले

उपविजेत्या राजस्थान रॉयल्सने नऊ खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर-नाईल, रसी व्हॅन डर डुसेन, शुभम गढवाल, तेजस बरोका यांचा समावेश आहे.

दिल्लीने पाच खेळाडूंना सोडले

दिल्ली कॅपिटल्सने पाच खेळाडूंना सोडले आहे. सोडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये शार्दुल ठाकूर, टीम सेफर्ट, अश्विन हेब्बर, श्रीकर भारत, मनदीप सिंग यांचा समावेश आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच खेळाडूंना सोडले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये जेसन बेहरेनडॉर्फ, अनिश्वर गौतम, छमा मिलिंद, लावनिथ सिसोदिया, शेरफेन रदरफोर्ड यांचा समावेश आहे.

लखनौने सात खेळाडूंना सोडले

लखनौ सुपर जायंटस्ने सात खेळाडूंना सोडले आहे. यामध्ये अँड्य्रू टाय, अंकित राजपूत, दुष्मंथा चमिरा, एविन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news