T20 World Cup ZIM vs NED : झिम्‍बाब्‍वेला धक्‍का; नेदरलँडचा दणदणीत विजय | पुढारी

T20 World Cup ZIM vs NED : झिम्‍बाब्‍वेला धक्‍का; नेदरलँडचा दणदणीत विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत आज ग्रुप -२ मध्‍ये झिम्बाब्वे विरुद्‍ध नेदरलँड  संघ ओव्‍हलच्‍या मैदानावर आमने-सामने आले. झिम्‍बाब्‍वेने प्रथम फलंदाजी करत नेदरलँडला ११८ धावांचे लक्ष्‍य दिले. मॅक्‍स ओडाडच्‍या अर्धशतकी खेळाच्‍या जोरावर  नेदरलँडने हे लक्ष्‍य सहज साध्‍य करत पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नेदरलँडचा या स्‍पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. तर पराभवामुळे झिम्‍बाब्‍वे संघाला सेमीफायनलपर्यंत पोहचण्‍याच्‍या प्रयत्‍नाला मोठा धक्‍का  बसला  आहे.

११७ धावांच्‍या लक्ष्‍याचे पाठलाग करणार्‍या नेदरलँडचा सलामीवीर स्‍टीफक मायबर्ग चौथ्‍या षटकाच्‍या दुसर्‍या चेंडूवर ८ धावांवर बाद झाला.पहिली विकेट गमावल्‍यानंतर नेदरलँडच्‍या मॅक्‍स ओडाड आणि टॉम कपूर यांनी संयमित खेळीचे प्रदर्शन घडवत डाव सावरला.

मॅक्‍सचे दमदार अर्धशतक

तेराव्‍या षटकातील अखेरच्‍या चेंडूचर ल्यूक जोंगवेने वेस्ले मधेवेरेकरवी टॉमला झेलबाद केले. १३ षटकानंतर नेदरलँडने  २ गडी गमावत ९१ धावा केल्‍या. टॉम कपूरपाठोपाठ कॉलिन एकरमॅक केवळ एका धाव करत तंबूत परतला. १४ षटकाच्‍या खेळानंतर नेदरलँडने ३ गडी गमावत ९२ धावा केल्‍या आहेत. मात्र विजयाच्‍या निर्धारानेच मैदानावर उतरलेल्‍या मॅक्‍सने दमदार अर्धशतक झळकावले तो ५२ धावांवर बाद झाला. मात्र त्‍यापूर्वी आठ चौकार तर एका षटकारांची आतषबाजी करत त्‍याने नेदरलँडला विजया समीप नेले.

झिम्बाब्वेने दिले ११८ धावांचे आव्‍हान

नाणेफेक जिंकत झिम्‍बाब्‍वेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र नेदरलँडच्‍या भेदक मार्‍यासमोर सलामीवीर झटपट तंबूत परतले. दुसर्‍या षटकाच्‍या तिसर्‍या चेंडूवर वेस्‍ले मधेवेरे याला मीकरेन याने त्रीफळाचीत केले. तर चौथ्‍या षटकाच्‍या अखेरच्‍या चेंडूवर कर्णधार क्रेग एर्विन याला ब्रँडन ग्‍लोवरने कर्णधार स्‍कॉट एडवडॅसकरवी झेलबाद केले. यानंतर सहाव्‍या षटकाच्‍या अखरेच्‍या चेंडूवर पाच धावांवर खेळणार्‍या रेजिस चकाबवा याला ब्रँडन ग्‍लोवरने पायचीत ( एलबीडब्ल्यू ) केले.

तीन विकेट झटपट गमावल्‍यानंतर सिंकदर रजा आणि सीन विलियम्‍स यांनी झिम्‍बाब्‍वेचा डाव सावरला. १२ षटकात २८ धावांवर विलियम्‍स तंबूत परतला. यानंतर सिंकदर रझाही २४ चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्‍या मदतीने ४० धावा फटकावल्‍या. सिंकदर बाद झाल्‍यानंतर झिम्‍बाब्‍वे संघाची पडझड सुरुच राहिली. बास डी लीड याने फ्रेडकरवी त्‍याला झेलबाद केले. यानंतर मिल्टन शुंबा दोन धावांवर, रयान बर्ल हे दोघेही केवळ २ धावांवर तर ल्यूक जोंगवे ६ धावांवर बाद झाला. अखेरच्‍या षटकात ब्लेसिंग मुजरबानी एक धावांवर बाद झाला. नेदरलँडने ११७ धावांवर झिम्‍बाब्‍वेचा संघ गुंडाळला. नेदरलँडच्‍या पॉल मीकेरेन याने ३, ब्रँडन ग्लोवर, वॉन बीक आणि बास डी लीड यांनी प्रत्‍येकी दोन तर फ्रेड क्‍लासेन याने एक विकेट घेतली.

 

 

Back to top button