T20 World Cup 2022 : भारताला सेमीफायनलची संधी | पुढारी

T20 World Cup 2022 : भारताला सेमीफायनलची संधी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आशिया चषकातील अपयश विसरून नव्या जोमाने आणि मजबूत इराद्याने टी-20 विश्वचषकाच्या मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच (T20 World Cup 2022) सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारून भारताने धडाकेबाज कामगिरी केली तर त्यापाठोपाठ टीम इंडियाने नेदरलँड संघावर 56 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत 4 गुणांसह अग्रस्थानी उडी घेतली.

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताला तगडी टक्कर देऊ शकतो, तर भारतासमोर बांगलादेश आणि झिम्बाब्वे तुलनेने कमजोर आहेत, पण विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. कारण बांगलादेशने भारतीय संघाला एकदा विश्वचषकातून बाहेर काढले होते, तर काल झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवून आपले इरादे स्पष्ट केलेत.

* आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवल्याने भारताला सेमीफायनलचे तिकीट खुणावत आहे. भारतीय संघाचे 4 पॉइंट्स झाले आहेत तसेच रनरेट देखील +1.425 एवढा आहे. भारताचा पुढील सामना ‘चोकर्स’ दक्षिण आफ्रिकेशी होत आहे.

* ग्रुप 2 मध्ये दक्षिण आफ्रिका दुसर्‍या क्रमांकावर आहे. द.आफ्रिकेचे 2 सामन्यात 1 विजय आणि 1 अनिर्णित सामन्यासह 3 गुण आहेत. पण द.आफ्रिकेची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांचा रनरेट +5.200 झाला आहे.

* टीम इंडिया ज्या ग्रुप 2 मध्ये आहे, त्या गटात तुलनेने कमी तुल्यबळ संघ आहेत, जसे की झिम्बाब्वे, नेदरलँड, बांगलादेश. जर कोणताही मोठा उलटफेर झाला नाही तर टीम इंडियाचे उपांत्य फेरीचे तिकीट नक्की मानले जात आहे. भारताला अजून तीन सामने खेळायचे आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्याशी भारताला दोन हात करायचे आहेत.

हे हि वाचा…

Back to top button