T20 World Cup | भारताचे पारडे जड, पण नेदरलँड उलटफेर करण्यात माहिर, पाहा या वेळेला सुरु होईल सामना | पुढारी

T20 World Cup | भारताचे पारडे जड, पण नेदरलँड उलटफेर करण्यात माहिर, पाहा या वेळेला सुरु होईल सामना

सिडनी : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज भारताचा सामना नेदरलँडशी (India vs Netherlands) होत आहे. सिडनीत हा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा हा सामना सहजपणे जिंकण्याचा प्रयत्न असेल. तर नेदरलँड उलटफेर करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. गेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ विकेटने पराभव केला होता. तर नेदरलँडला बांगलादेशकडून ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आजच्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. पण नेदरलँडला कमी समजून चालणार नाही.

पाकिस्तान विरोधातील सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल फ्लॉप ठरले होते. आज रोहित आणि राहुलला पुन्हा फॉर्म मिळवण्याची संधी आहे. जेणेकरून त्यांना आगामी सामन्यांत दडपण न घेता खेळता येतील. आज India vs Netherlands सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुरु होईल. टॉस १२ वाजता होईल. या सामना स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल.

नेदरलँडची टीम कमकुवत आहे असे मानता येणार नाही. हा संघ भारताला कडवी टक्कर देऊ शकतो. नेदरलँडने २००९ आणि २०१४ च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला हरवले होते. यामुळे आजचा भारत विरुद्धचा त्यांचा सामना रोमांचकदेखील होऊ शकतो.

टी २० वर्ल्डकपमधील (T20 World Cup) रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ४ विकेटस् राखून पराभव केला होता. विराट कोहलीने (Virat Kohli) ५३ चेंडूंत ८२ धावा केल्या. त्याने हार्दिक पंड्याबरोबर पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत हातातून गेलेला विजय खेचून आणला. भारताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी १ धावेची गरज असताना अश्विनने एकेरी धाव घेत सामना संपवला होता.

 हे ही वाचा :

Back to top button