Adam Zampa : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया मोठा धक्का! अॅडम झाम्पा कोरोना पॉझिटीव्ह | पुढारी

Adam Zampa : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया मोठा धक्का! अॅडम झाम्पा कोरोना पॉझिटीव्ह

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाला (Adam Zampa) कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळू शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडकडून दारूण पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडने तो सामना 89 धावांनी जिंकला होता.

श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी झाम्पा खूप महत्त्वाचा… (Adam Zampa)

अलीकडेच आयरिश अष्टपैलू जॉर्ज डॉकरेल कोविड पॉझिटिव्ह असूनही श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. आयसीसी विश्वचषकाच्या नवीन नियमांनुसार, कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरीही खेळाडू सामन्यात खेळू शकतो. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाला झाम्पा बाबतचा निर्णय घ्यावा लागेल. एका रिपोर्टनुसार, अॅडम झाम्पामध्ये कोविड-19 ची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो मैदानावर उतरेल की नाही याबाबत असून स्पष्टता नाही.

क्रीडा पत्रकार निक सेवेज यांनी ट्विट केले की, ‘बेनहॉर्न 8 च्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर अॅडम झाम्पाचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि पर्थमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 विश्वचषक सामन्यात तो खेळणे संशयास्पद आहे.’

अॅडम झाम्पा (Adam Zampa) जर संघात नसेल तर त्याचा पर्याय ऑस्ट्रेलिया संघाकडे उपलब्ध आहे. जर झाम्पा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही तर त्याच्या जागी ऍश्टन अगरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. अगर भारताविरुद्ध अधिकृत सराव सामन्यात खेळला होता. झाम्पाने आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 22.31 च्या सरासरीने आणि 19.14 च्या स्ट्राइक रेटने 78 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी, अगरने 46 टी-20 सामन्यांमध्ये 22.3 च्या सरासरीने 47 विकेट घेतल्या आहेत.

Back to top button