सौरव गांगुलीची अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार | पुढारी

सौरव गांगुलीची अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कैब) अध्यक्षपदाच्या शर्यतीतून स्वत: माघार घेतली आहे. निवडणुकीत उभे राहिले असते तर त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु माघारीमुळे सौरवचा मोठा भाऊ स्नेहशिष गांगुली यांची ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत कैबच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सौरव गांगुलीने २०१९ मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यानंतर त्यांनी तीन वर्षे या पदावर काम केले. त्यांना पदावर कायम राहायचे आहे, असे स्पष्टपणे सांगूनही अचानक त्यांना पदावरून हटवण्यात आले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड न झाल्याने गांगुलीने आठवडाभरापूर्वीच सीएबी प्रमुखपदी परतण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यांनी नामांकनाच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ‘मी निवडणूक लढवली तर दोन किंवा त्याहून अधिक लोकांना कोणतेही पद मिळणार नाही, म्हणून मी माघार घेतली. माझी बिनविरोध निवड झाली असती पण ते योग्य नाही असे मला वाटले. ते पुढील तीन वर्षे काम करतील आणि त्यानंतर पाहू असे गांगुलीने म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांचा मोठा भाऊ स्नेहशिष गांगुली यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा :

Back to top button