

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कॅचेस विन मॅचेस' का म्हणतात, याची प्रचिती पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरु्दध न्यूझीलंडच्या सामन्यावेळी आली. या सामन्यात न्यूझीलंडने उत्कृष्ट फलंदाजीबरोबर गोलंदाजीसह फिल्डींगमध्येही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. आजच्या सामन्यात न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स ( Glenn Phillips ) याने घेतलेला झेप पाहून सर्वच क्रिकेटप्रेमींच्या तोंडी एकच वाक्य आलं… जबरदस्त..याला म्हणतात कॅच!
२०१ धावांचा पाढलाग करणार्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसर्याच षटकामध्येच पहिला धक्का बसला. डेव्हिड वॉर्नर सहा चेंडूत पाच धावांवर बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजांना सूर सापडलाच नाही. सलग दोन गडी तंबूत परल्यानंतर मिचेल सँटनर याच्या गोलंदाजीवर मार्कस स्टोईनिस उत्तुंग फटका लगावला. यावेळी ग्लेन फिलिप्स याने झेपावत स्टोईनिसचा झेल फकडला. ग्लेन फिलिप्स ( Glenn Phillips ) याने केलेली फिल्डींग हा या सामन्यातील सर्वोच्च क्षण ठरला. त्याचे संघासाठीचे समर्पण चर्चेचा विषय ठरला असून, या सर्वोत्कृष्ट कॅचचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया आजपासून प्रारंभ झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने दिमाखदार विजय मिळवला. पारंपरिक शेजारी ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेतील प्रतिस्पर्धी संघांना न्यूझीलंडने एकप्रकारे इशाराच दिला आहे.