करीम बेंझेमा बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी | पुढारी

करीम बेंझेमा बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी

पॅरिस (वृत्तसंस्था) :  फुटबॉल स्टार मेस्सी, रोनाल्डोला मागे सारत फ्रान्सचा करीम बेंझेमा ‘गोल्डन बॉल’चा मानकरी ठरला आहे. करीम बेंझेमाला सोमवारी जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्यावर्षी चॅम्पियन्स लीग आणि ला लीगामध्ये रिअल माद्रिदला यश मिळवून देणारा बेंझेमा हा 24 वर्षांत प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा पहिला फ्रेंच फुटबॉलपटू आहे.

फ्रान्सच्या एकूण पाच फुटबॉलपटूंनी आतापर्यंत ही ट्रॉफी जिंकली आहे. बेंझेमाने या घोषणेनंतर आपल्या आई आणि मुलालाही मंचावर आमंत्रित केले. सोमवारच्या समारंभात झिदाननेच त्याला ट्रॉफी प्रदान केली. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला माझ्या कामाचा अभिमान वाटत असल्याचे बेंझेमा याने सांगितले. हे माझे बालपणीचे स्वप्न होते. माझ्याकडे दोन आदर्श आहेत, झिदान आणि रोनाल्डो. मला विश्वास आहे की, काहीही शक्य आहे.

 

Back to top button