

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली तरुणाईचा आर्दश. त्याचा फिटनेस, बॅटिंग आणि स्टाईलवर लाखो फॅन्सची नजर असते. लडाखसारख्या दुर्गम भागातील एक चिमुकलीही विराटची फार मोठी फॅन आहे; पण ती केवळ चाहती नाही तर तिला विराटसारखं क्रिकेट खेळायचं आहे. ( Batting Video ) तिच्या बॅटिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही तिची बॅटिंग पाहिलात म्हणाल, खरच ही चिमुकली विराट साखरचं खेळतीय!
व्हायरल व्हिडिओमधील बॅटिंग करत असलेल्या या चिमुकलीचे नाव मकसूमा आहे. ती या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, 'मी विराट कोहलीसारखे खेळण्यासाठी जीव तोडून मेहनत घेणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून मकसूमाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती चौकार-षटकार लगावताना दिसत आहे.
मला क्रिकेट खेळण्यासाठीघरी आई-वडिलांकडून तर शाळेत शिक्षकांनी प्रोत्साहन मिळते. मी विराट कोहलीप्रमाणे बॅटिंग करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सोबतच मला हेलिकॉफ्टर शॉट खेळायला शिकायचा आहे. मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आहे. आता खासकरून हेलिकॉफ्टर शॉट खेळायला शिकत आहे. विराट कोहली माझा फेवरेट क्रिकेटर आहे आणि मी त्याच्याप्रमाणे क्रिकेट खेळणार आहे, असेही मकसूमा या व्हिडीओमध्ये सांगताना दिसते.
मकसूमाच्या बॅटिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. लडाखसारख्या दुर्गम भागातील मुलीची क्रिकेट खेळासाठीच्या आवश्यक असणार्या नैसर्गिक प्रतिभेचे कौतूक होत आहे.