Women’s IPL | मार्चमध्ये रंगणार महिला आयपीएलचा थरार, पहा संघ किती, कसे असेल प्लेइंग इलेव्हन?

Women’s IPL | मार्चमध्ये रंगणार महिला आयपीएलचा थरार, पहा संघ किती, कसे असेल प्लेइंग इलेव्हन?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मार्च २०२३ मध्ये बहुप्रतीक्षित महिला इंडियन प्रीमियर लीग (Women's IPL) स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. महिलांच्या आयपीएलमध्ये पाच संघ असतील. दक्षिण आफ्रिकेतील महिला T20 विश्वचषक स्पर्धा २६ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर लगेचच BCCI मार्च २०२३ साठी पाच संघांमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवणार आहे.

पीटीआयच्या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की बीसीसीआयने राज्य संघटनांना पाठवलेल्या नोटनुसार महिला आयपीएलमध्ये २० लीग सामने खेळले जातील आणि संघ दोनवेळा एकमेकांशी लढतील. गुणतालिकेतील टॉपर्स थेट फायनलमध्ये प्रवेश करतील, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर राउंडमध्ये लढतील. प्रत्येक संघात १८ खेळाडू असतील. त्यात परदेशातील जास्तीत जास्त सहा खेळाडूंचा समावेश असणार आहे.

"देशातील आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समतोल राखण्यासाठी आणि स्पर्धात्मक संघ असण्यासाठी WIPL साठी पाच संघ खेळवण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक संघात जास्तीत जास्त अठरा खेळाडूंचा समावेश असू शकतो. तर प्रत्येक संघात सहाहून अधिक परदेशी खेळाडू असणार नाहीत. पाच पेक्षा जास्त परदेशी खेळाडूंमध्ये ICC च्या पूर्ण सदस्यांपैकी चार आणि ICC च्या असोसिएट सदस्यांपैकी एक खेळाडू प्रत्येक संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकत नाही, असे BCCI ने म्हटले आहे.

"पुरुष खेळाडूंच्या आयपीएलप्रमाणेच Women's IPL मध्ये होम-अवे फॉरमॅटमध्ये खेळणे आव्हानात्मक असेल. कारण पाच ते सहा संघांसोबत दररोज एक सामना खेळणे शक्य नाही. याबाबत अशी सूचना करण्यात आली आहे की ही स्पर्धा caravan style मध्ये खेळवली जाऊ शकते. जेथे एका ठिकाणी दहा सामने पूर्ण खेळवल्यानंतर पुढील दहा सामने पुढील ठिकाणी खेळवले जातील. याचाच अर्थ २०२३ च्या WIPL हंगामात प्रत्येकी दहा सामने दोन ठिकाणी खेळवले जाणार आहेत.

"WIPL मधील संघ विकला जाऊ शकतो आणि सध्या IPL सामने आयोजित केलेल्या ठिकाणी सामने होऊ शकतात," असेही सूचित करण्यात आले आहे. अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या ठिकाणी सामने खेळवण्याचा विचार आहे. महिला आयपीएलशी संबंधित सर्व बाबींवर अंतिम निर्णय आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआयचे पदाधिकारी घेतील, असे सांगण्यात आले आहे.

बीसीसीआयच्या माहितीनुसार, "गेल्या आठ वर्षात विविध श्रेणींमध्ये खेळाडूंच्या सहभागामध्ये एकूण १११ टक्के वाढ झाली आहे. महिलांच्या वरिष्ठ गटात १२९ टक्के वाढ झाली आहे. तर १९ वर्षांखालील गटातही खेळाडूंचा सहभाग वाढला आहे."

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news