Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्यावर अखेर सौरव गांगुलीने सोडले मौन, म्हणाला…

Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्यावर अखेर सौरव गांगुलीने सोडले मौन, म्हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी यशस्वी कर्णधार तथा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी सहभागच घेतला नव्हता. आता त्यांच्या जागी १९८३ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे खेळाडू तसेच माजी क्रिकेट रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष होणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. सौरव गांगुली यांना पुन्हा बीसीसीआयचा अध्यक्ष सहजच बनने शक्य होते. पण, त्यांनी या सर्वातून आता बाहेर पडणे पसंद केले आहे. याबाबत त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत या सर्वांबाबत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा खुलासा केला.

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी खेळाडू, सलामीवीर तसेच सर्वात यशस्वी कर्णधार अशी कामगिरी सौरव गांगुली यांनी बजावली. यासह त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सुद्धा यशस्वीरित्या सांभाळले. यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष बनत बोर्डाला वेगळ्या स्थानावर पोहचवले. शिवाय याचा लाभ भारतीय संघ आणि आयपीएल सारख्या स्पर्धेला झाला. देशातंर्गत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये सुधारणा केली. त्यांच्या काळात अनेक खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध आपापले योगदान दिले. या अर्थाने सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची बीसीसीआय अध्यक्षपदाची कारकिर्द देखील अत्यंत यशस्वी राहिली.

या सर्व पाश्वभूमीवर ते पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कायम राहतील अशीच स्थिती होती. पण त्यांनी या सर्वांतून माघार घेतली आहे. या त्यांच्या भूमिकेवर बोलताना सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितले की, 'तुम्ही कायम खेळू शकत नाही, तसेच कोणीही कायमस्वरुपी व्यवस्थापणात राहू शकत नाही.' हे दोन्ही मी पाहिले आहे. या दोन्ही बाजूचा मी आनंद घेतला आहे. हे एकाचा नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे आहे. आता मला भविष्यत अजून काहीतरी आणखी मोठं करायचे आहे.'

यावेळी सौरव गांगुली म्हणाले, मी पाच वर्षे बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष होतो. आज मी बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. सर्वांनंतर सुद्धा आपल्या हे सर्व सोडायचे आहे आणि जायचे आहे. संघाच्या प्रगतीसाठी आणि इतर अनेक गोष्टींसाठी एक प्रशासक म्हणून तुम्हाला खूप काही करावे लागले. मी एक खेळाडू असल्यामुळे या सर्वांच्या आसपास होतो, त्यामुळे या सर्व गोष्टीं व्यवस्थीत करता आल्या. एक प्रशासक या मी भूमिकेतून या सर्वांचा मी भरपूर आनंद घेतला असल्याचे गांगुली यांनी सांगितले. त्यामुळे कोणीही एका ठिकाणी कायम स्वरुपी रहात नाही असे सांगत आणखी मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची भाकीत यावेळी सौरव गांगुली यांनी दिली. त्यांनी केलेले भाकित हे आयसीसीचे अध्यक्षपद सुद्धा असू शकते.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news