IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे मालिकेतील आज निर्णायक सामना | पुढारी

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे मालिकेतील आज निर्णायक सामना

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी होणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पण, भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात विजय मिळवणे अत्यावश्यक बनले आहे. कारण 2023 साली होणार्‍या वन-डे विश्वचषकातील क्रमवारीवर या निकालाचा परिणाम होणार आहे.

सध्या ते वर्ल्डकप सुपर लीग पॉईंट टेबलमध्ये अकराव्या स्थानावर आहेत. श्रीलंका आणि आयर्लंड त्यांच्या पुढे आहेत. पुढच्या जूनमध्ये विश्वचषकासाठी पात्रता फेरी होणार आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला पाच सामने खेळायला मिळणार आहेत. यातून त्यांना जर दहा गुण मिळवता आले तर आठव्या स्थानावर येऊन त्यांना वर्ल्डकपमध्ये थेट प्रवेश मिळू शकतो. (IND vs SA)

त्यांच्या द़ृष्टीने कर्णधार टेम्बा बवुमाचा फॉर्म महत्त्वाचा आहे. दुसर्‍या सामन्यात किरकोळ आजारपणामुळे तो खेळला नव्हता; परंतु तिसर्‍या सामन्यात तो खेळण्याची दाट शक्यता आहे. प्रशिक्षक मार्क बाऊचर याची ही शेवटची द्विपक्षीय मालिका आहे. वर्ल्डकपनंतर तो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकपद सोडून मुंबई इंडियन्सच्या गोटात सामील होणार आहे.

स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क

Back to top button