INDvsSA ODI : दक्षिण आफ्रिकेला सलग दाेन धक्‍के, क्‍लासेनपाठाेपाठ मार्करामही तंबूत | पुढारी

INDvsSA ODI : दक्षिण आफ्रिकेला सलग दाेन धक्‍के, क्‍लासेनपाठाेपाठ मार्करामही तंबूत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दक्षिण आफ्रिकेने दोन विकेट झटपट गमावल्‍यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले.  हेंड्रिक्‍सने ५८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केले. तर मारक्रमने ६४ चेंडूत अर्धशतक झळकावले. या दोघांच्‍या शतकी भागीदारामुळे दक्षिण आफ्रिकेने  सामन्‍यात  कमबॅक केले . मात्र वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराजने दमदार फलंदाजी करणार्‍या हेंड्रिक्‍सला तंबूत धाडले. त्‍याने ७६ चेंडूत ७४ धावा केल्‍या. त्‍याने मार्करामच्‍या साथीने १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर आलेल्‍या ३० धावांवर खेळणार्‍या क्‍लासेनला कुलदीप यादवने मोहम्‍मद सिराजकडे झेल देणे भाग पाडले. यानंतर ८९ चेंडूत मार्करामने ७९ धावांवर खेळणार्‍या एडन मार्कराम याला वॉशिंग्टन सुंदरने कर्णधार शिखर धवनकडे झेल देणे भाग पाडले. ३९ षटकांमध्‍ये दक्षिण आफ्रिका संघाने ५ बाद २१७ धावा केल्‍या आहेत.

रांची येथे होणार्‍या दुसर्‍या वन-डे सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शाहबाज अहमदने दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला आहे. त्याने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात बळींचे खाते उघडले. त्याने मलानला एलबीडब्ल्यू आऊट केले. अंपायरने आऊट दिले नसले तरी यष्टिरक्षक संजू आणि शाहबाज यांनी धवनला रिव्ह्यू घेण्यास सांगितले आणि त्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने 2 गडी गमावून 40 धावा केल्या हाेत्‍या.

आवेशने पहिल्याच षटकात नऊ धावा दिल्या

डी कॉक बाद झाल्यानंतर मलान आणि हेंड्रिक्स यांनी सावधपणे फलंदाजी केली. पण संधी मिळाल्यावर दोघांनी फटकेबजी केली. आवेश खानने पहिल्याच षटकात नऊ धावा दिल्या. आठ षटकांनंतर आफ्रिकन संघाने एका विकेटवर 35 धावा केल्या.

द. आफ्रिकेला पहिला झटका

मोहम्मद सिराजने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने क्विंटन डी कॉकला पाच धावांवर क्लीन बोल्ड केले. चेंडू डी कॉकच्या बॅटला लागून स्टंपवर गेला आणि तो बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. गेल्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली. आता भारताला दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीवर दडपण आणण्याची संधी आहे कारण मलानचा फॉर्म फारसा खास नाही आणि हेंड्रिक्सला बऱ्याच कालावधीनंतर संधी मिळाली आहे. सिराजने तिसऱ्या षटकात एकही धाव दिली नाही आणि तीन षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची एक बाद सात अशी स्थिती होती.

दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदर (IND Vs SA)

दीपक चहर दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेतून बाहेर पडला आहे. भारताने त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला आहे. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात चहरला दुखापत झाली होती.दीपक चहर एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळला नाही, आता तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, आवेश खान, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), येनेमन मलान, रेझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पेर्नेल, केशव महाराज (कर्णधार), कागिसो रबाडा, ब्योर्न फोर्टुइन, लुंगी एनगिडी.

Back to top button