Legends League Cricket : मैदानातच दोन दिग्‍गज क्रिकेटपटूमध्‍ये ‘राडा’ , जॉन्सनने दिला युसूफ पठाणला धक्‍का (पाहा व्‍हिडीओ )

Legends League Cricket मधील भीलवाडा किंग्‍सचा अष्‍टपैलू खेळाडू युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्‍सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसन हे रविवारी ( दि. २ ) मैदानातच एकमेकांच्‍या अंगावर धावून गेले.
Legends League Cricket मधील भीलवाडा किंग्‍सचा अष्‍टपैलू खेळाडू युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्‍सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसन हे रविवारी ( दि. २ ) मैदानातच एकमेकांच्‍या अंगावर धावून गेले.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Legends League Cricket मधील भीलवाडा किंग्‍सचा अष्‍टपैलू खेळाडू युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्‍सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन हे रविवारी ( दि. २ ) मैदानातच एकमेकांच्‍या अंगावर धावून गेले. यावेळी जॉन्सन याने युसूफला धक्‍का दिल्‍याने मैदानावर काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर पंचांनी मध्‍यस्‍ती करत दाेघांना बाजूला केले. मैदानावर झालेल्‍या या प्रकारचा व्‍हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल होत आहे.

Legends League Cricket स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून माजी दिग्‍गज खेळाडू पुन्‍हा एकदा मैदानावर उतरले आहेत. अनेक खेळाडू उत्‍कृष्‍ट क्रिकेटचे प्रदर्शन करत आहेत. स्‍पर्धा जशी पुढे सरकत आहे तशी त्‍यामधील रंगत वाढत आहे. रविवारी भीलवाडा किंग्‍सचा अष्‍टपैलू खेळाडू युसूफ पठाण आणि इंडिया कॅपिटल्‍सचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन हे आमने-सामने आले. या घटनेचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्‍हायरल होत आहे.

Legends League Cricket : मैदानात काय घडलं?

सामना सुरु असताना युसूफ पठाण आणि मिचेल जॉन्सन यांच्‍यात  शाब्‍दिक चकमक उडाली. यानंतर जॉनसन याने युसूफला धक्‍का दिला. या धक्‍कादायक प्रकाराने काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर पंचांनी मध्‍यस्‍थी करुन दोन्‍ही खेळाडूंना बाजूला केले.

जोधपूरमधील बरकतुल्‍लाह खान मैदानावर झालेल्‍या सामन्‍यात इंडिया कॅपिटल्‍सने सामना चार विकेटने जिंकला. न्‍यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर आणि वेस्‍ट इंडिजचा माजी फलंदाज एशले नर्स याने धडाकेबाज फलंदाजी केली. टेलर याने ३९ चेंडूत ८४ धावा तर नर्स याने ६० धावांची नाबाद खेळी केल्‍याने इंडिया कॅपिटल संघाने तीन चेंडू राखत २२६ धावांचे लक्ष्‍य पूर्ण केले. मात्र हा सामना पठाण आणि जॉन्सन यांच्‍यात झालेल्‍या राड्यामुळे जास्‍त चर्चेत राहिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news