IND vs SA : भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान | पुढारी

IND vs SA : भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यांनतर भारताने प्रथम फलंदाजी करत २३७ धावा केल्या आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २३८ धावांचे आव्हान ठेवले आहे. सुर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ही मोठी धावसंख्या उभी केली.

भारताकडून सुर्यकुमार यादवने ५ चौकार आणि ५ षटकार लगावत २२ चेंडूमध्ये ६१ धावा काढल्या. तर के.एल. राहुलने ५ चौकार आणि ४ षटकार लगावत २८ चेंडूमध्ये ५७ धावा काढल्या. सुर्यकुमार यादव आणि के.एल.राहुल यांच्या पाठोपाठ विराट कोहलीनेही २८ चेंडूमध्ये ४९ धावांची खेळी केली.

भारताला कमी धावसंख्येत रोखण्याच्या इराद्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला होता. मात्र, भारताचे सलामीवर रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांनी दमदार सुरूवात करत पावरप्ले अखेर ५७ धावा केल्या. सलामीवीर रोहित आणि के.एल.राहुल बाद झाल्यानंतर भारताचा डाव सुर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी सावरला. सुर्यकुमार यादवने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभी केली. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने फटकेबाजी करत भारताला २३७ धावापर्यंत पोहचवले.

दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने ४ षटकांमध्ये २३ धावा देत २ विकेट्स पटकावल्या. केशव महाराज शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. आफ्रिकेचे इतर गोलंदाज महागडे ठरले आहेत. वेन पारनेलने  ४ षटकांमध्ये ५४ धावा, लुंगी एन्गिडीही ४ षटकामध्ये ४९ धावा देत महागडा ठरले.

हेही वाचा;

Back to top button