Roger Federer retirement | रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा! राफेल नदाललाही अनावर झाले अश्रू, पहा भावूक क्षण (VIDEO)

Roger Federer retirement | रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा! राफेल नदाललाही अनावर झाले अश्रू, पहा भावूक क्षण (VIDEO)
Published on
Updated on

लंडन : ४१ वर्षीय स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने टेनिसला अलविदा (Roger Federer retirement) केला आहे. त्याने शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी त्याच्या टेनिस कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. अखेरच्या सामन्यादरम्यान टेनिस कोर्टवर भावूक क्षण पहायला मिळाला. फेडरर याच्यासह त्याचा कडवा प्रतिस्पर्धी राफेल नदाल (Rafael Nadal) डोळ्यातील अश्रू रोखू शकला नाही. फेडररने काही दिवसांपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर लंडनमध्ये काल झालेल्या Laver Cup च्या अंतिम सामन्यानंतर फेडररने टेनिसला अलविदा केले.

लंडनमधील लॅव्हर कपमध्ये राफेल नदाल सोबत फेडररने दुहेरीचा सामना खेळला. टीम युरोपच्या फेडरर आणि नदाल जोडीला टीम वर्ल्डच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक यांच्याकडून ४-६, ७-६ (७/२), ११-९ असा पराभव पत्करावा लागला. हा सामना झाल्यानंतर फेडररने नदालची गळाभेट घेतली आणि दोघेही भावूक झाले. यावेळी दोघेही अश्रू आवरु शकले नाहीत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टेनिस कोर्टवर कडवे प्रतिस्पर्धी असणारे हे दोघे खेळाडू कोर्ट बाहेर चांगले मित्र आहेत. अखेरचा सामना नदाल सोबत खेळण्याची फेडररची इच्छा होती. त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. फेडररने दोन दशकांच्या आपल्या टेनिस कारकिर्दीत १,२५१ सामने खेळले आहेत. त्याने २० ग्रँडस्लॅम विजतेपदे जिंकली आहेत. स्पेनचा नदाल हा फेडररचा जवळपास दोन दशकांहून अधिक काळ कडवा प्रतिस्पर्धी राहिला आहे.

२००४ मध्ये पहिल्यांदा या दोघांची भेट झाली होती. ते ९ ग्रँडस्लॅम फायनलसह ४० वेळा खेळले आहेत. नदालने २४-१६ असा जिंकण्याचा विक्रम केला आहे. पुरुष एकेरीची विक्रमी २२ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नदालने म्हटले आहे की, अखेरच्या सामन्यात पराभव झाला. यामुळे फेडररसाठी भावनिकदृष्ट्या ही कठीण प्रसंग होता. "माझ्यासाठी आमच्या खेळाच्या इतिहासातील या संस्मरणीय क्षणाचा एक भाग बनणे हा खूप मोठा सन्मान आहे आणि त्याचवेळी अनेक वर्षांनी अनेक गोष्टी एकत्र शेअर करता आल्या," असे नदालने फेडररबद्दल सांगितले. (Roger Federer retirement)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news