हार्दिक पंड्यावर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची स्तुतीसुमने… | पुढारी

हार्दिक पंड्यावर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची स्तुतीसुमने...

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या खेळीने क्रिकेट चाहत्यांना वेड लावलेच आहे, आता तर खुद्द पाकिस्तानचे माजी कर्णधार रशीद लतीफ स्तुतीसुमने उधळली आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पंड्याने ३० बॉल मध्ये ७१ धावा ठोकून आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवला होता. त्याच्या या खेळीने प्रभावित होत लतीफ यांनी पंड्याची तुलना इंग्लंड संघाचा माजी ऑलराउंडर खेळाडू बेन स्टोक्स यांच्याबरोबर केली आहे. त्यांनी यावेळी म्हटले आहे की, पंड्याच्या धुवांधार बॅटिंगने जगाला बेन स्टोक्सच्या मालिकेत अजून एक ऑलराउंडर जोडला गेला आहे.

दरम्यान स्टोक्स सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर आहेतच, त्यामुळेच त्यांनी २०१९ चा वर्ल्डकप इंग्लंडला जिंकून देण्यात मोलाचा हातभार लावला होता. त्यांची जागा घेणे कठीण आहे पण त्यांच्या बरोबरीला पंड्याची खेळी असल्याचेही ते म्हणाले. बेन स्टोक्स सर्वश्रेष्ठ आहेतच पण काही गोष्टींमध्ये पंड्या त्यांच्याहूनही सरस दिसून आला आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.

हे वाचलंत का?

Back to top button