टोकिया पॅरालिम्पिक : बॅडमिनटनपटू प्रमोद भगतने जिंकले सुवर्णपदक! | पुढारी

टोकिया पॅरालिम्पिक : बॅडमिनटनपटू प्रमोद भगतने जिंकले सुवर्णपदक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रमोद भगतने अप्रतिम कामगिरी करत बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे चौथे सुवर्णपदक आहे. आजच्या (दि. ४ सप्टेंबर) दिवसभरातील हे भारतासाठीचे दुसरे सुवर्ण पदक आहे. तर दुस-या एका सामन्यात मनोज सरकारने

प्रमोदने अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या जागतोक क्रमवारीत दुस-या क्रमांकाच्या डेनियल बेथेलचा पराभव केला. बेथेलवर २१-१४, २१-१७ अशी सरळ दोन गेममध्ये मात देत प्रमोद भगतने सुवर्णपदक आपल्या नावे केले. याचबरोबर ३३ वर्षीय प्रमोद पॅरालिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.

दरम्यान, मनोज सरकारने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले. त्याने जपानच्या डेसुके फुजीहाराचा सरळ गेममध्ये २२-२० आणि २१-१३ असा पराभव केला. हा सामना ४७ मिनिटे चालला. पहिला गेम २७ मिनिटे आणि दुसरा गेम १९ मिनिटे चालला.

 

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण १७ पदकांची कमाई केली आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य पदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत आणि कांस्य पदक विजेत्या मनोज सरकार याच्यावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Back to top button