World Championship : विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत रचला नवा विक्रम | पुढारी

World Championship : विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकत रचला नवा विक्रम

पुढारी ऑनलाईन: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. ( World Championship ) बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत तिने सलग दोन कास्यपदक पटकत नवा विक्रम केला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.

बुधवारी तिने स्वीडनच्या एम्मा माल्मग्रेनचा 8-0 असा पराभव करत कांस्यपदक पटकावले. ( World Championship ) जागतिक चॅम्पियनशिपमधील हे तिचे दुसरे पदक आहे. यापूर्वी 2019 मध्येही विनेशने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.

याआधी पात्रता फेरीत मंगोलियाच्या खुलान बतखुयागा हिचा तिने ७-० असा पराभव केला होता. यावर्षी सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे जागतिक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विनेशचा पराभव झाल्याने भारताच्या पदकाच्या आशेला मोठा धक्का बसला होता; पण ती हिंमत हारली नाही, शेवटच्या सामन्यात तिने स्वीडनच्या एम्मा जोआना माल्मग्रेनचा 8-0 असा पराभव केला. अन् रेपेचेज फेरीच्या शेवटच्या सामन्यात हे कांस्यपदक जिंकले. अलीकडेच बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात विनेश फोगटने सुवर्णपदक जिंकले होते.

Back to top button