खेळाडूंवर विश्‍वास ठेवल्यानेच संघ विजयी बनतो : रोहित शर्मा | पुढारी

खेळाडूंवर विश्‍वास ठेवल्यानेच संघ विजयी बनतो : रोहित शर्मा

दुबई : भारताने पाकिस्तानवर अखेरच्या षटकात दमदार विजय साकारला; पण भारताने हा सामान कसा जिंकला, हे भारताचा कर्णधार रोहित शर्माने फक्‍त एका वाक्यात सांगितले. सामन्यानंतर बोलताना रोहितने बर्‍याच गोष्टी सांगितल्या; पण सर्वात महत्त्वाचा एक शब्द त्याने सांगितला आणि तो म्हणजे विश्‍वास. जेव्हापासून रोहित संघाचा कर्णधार झाला आहे, तेव्हापासून त्याने खेळाडूंवर विश्‍वास ठेवला आहे आणि त्याचाच परिपाक या सामन्यात पाहायला मिळाला. रोहित म्हणाला की, आम्ही अशाच टीमवर विश्‍वास ठेवू इच्छितो.

तुम्ही सामन्यात कुठेही नसाल, विजयाची शक्यता दुरापास्त असेल किंवा विजयापासून लांब असाल; पण तरीही तुम्ही विजय मिळवता, हे सर्वात महत्त्वाचे आहे. माझ्या मते, खेळाडूंवरील विश्‍वास सर्वात महत्त्वाचा आहे. आपल्याला सामन्यात नेमके काय करायचे आहे, हे त्यांना सांगण्यात आले होते. खेळाडूंना नेमके काय करायचे, याची स्पष्टता देण्यात आली होती. त्यामुळे या सामन्यात आम्ही जी रणनीती आखली आणि त्यामध्ये यशस्वी ठरलो.

Back to top button