Asia Cup 2022 : रोहितने केली विराटची बरोबरी जाणून घ्या सविस्तर | पुढारी

Asia Cup 2022 : रोहितने केली विराटची बरोबरी जाणून घ्या सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप २०२२ च्या टी २० सामन्यांचा थरार सुरु झाला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (Asia Cup 2022) या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. हा सामना भारताने जिंकताच रोहितने आपल्या कॅप्टन्सीमध्ये एक नवा इतिहास रचला आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत ३५ टी २० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी २९ टी २० सामन्यात रोहितने टीम इंडियाला विजयी मिळवला होता. पाकिस्तान विरुद्ध (Asia Cup 2022) हा सामना भारताने जिंकताच रोहित शर्मा ३० विजयांसह सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. रोहितने कर्णधार म्हणून ३० वा टी २० सामना जिंकून विराटच्या विक्रमाची बरोबरी केली.

भारतीय संघासाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावे सर्वाधिक टी २० सामने जिंकण्याच्या विक्रम आहे. विराटने ५० सामन्यात नेतृत्व केले होते. त्यापैकी ३० सामन्यामध्ये विराटने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले होते. रोहितने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकून विराटच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

आशिया चषकातील आजच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवला. रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला. विराट कोहलीने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ३४ चेंडूमध्ये ३५ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने २ चौकार आणि २ षटकार लगावत २८ चेंडूमध्ये ३५ धावांची खेळी केली. विराट कोहलीच्या या दमदार खेळीच्या बळावर भारताने हा विजय संपादन केला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक टी-20 सामन्यात भारताच्या कडक गोलंदाजीपुुढे पाकिस्तानच्या फलंदाजीने नांगी टाकली. त्यांचा संपूर्ण डाव 19.5 षटकांत 147 धावांत संपला. भुवनेश्‍वर कुमारने 26 धावांत 4 तर हार्दिक पंड्याने 25 धावांत 3 विकेटस् घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना सुरुंग लावला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या.

Back to top button