

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dhanashree Verma-Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने सध्या क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. तो थेट आशिया कपमध्ये परतणार आहे. मात्र युझवेंद्र चहल हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. चहलने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यानंतर त्याच्या संसाराशी संबंधित अनेक रंजक आणि धक्कादायक चर्चा होत आहे.
युजवेंद्र चहल आणि त्याची कोरिओग्राफर पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सर्व काही ठीक आहे का? याबद्दल चाहते गोंधळात पडले आहेत. याला काराण म्हणजे धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या नावातून 'चहल' हे आडनाव काढून टाकले आहे. तिने धनश्री वर्मा-चहल हे नाव बदलून तिथे फक्त धनश्री वर्मा एवढाच उल्लेख केला आहे. त्याचवेळी युजवेंद्र चहलनेही इन्स्टाग्रामवर एक विचित्र पोस्ट शेअर केली होती मात्र काही वेळाने ती पोस्ट त्याने डिलीट केल्याचे समोर आले आहे.
चहलने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये "New Life Loading' (न्यू लाइफ लोडिंग) असे लिहिले होते. जरी त्याने ही पोस्ट काही वेळातच डिलीट केली असली तरी चहल आणि धनश्रीचे इन्स्टा अकाऊंट पाहिल्यानंतर चाहत्यांचा अंदाज आहे की दोघांमध्ये सर्व काही ठीक नाहीय. ट्विटरवरही अनेक चाहते दोघांच्या नात्याबद्दल चर्चा करत आहेत. मात्र, युझवेंद्र आणि धनश्री या दोघांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (Yuzvendra Chahal-Dhanashree Verma)
या इन्स्टा स्टोरीनंतर धनश्रीने तिचे आडनाव काढून टाकले होते. यानंतर अनेक चाहत्यांची धनश्रीच्या आयुष्यात कोणीतरी दुसरा येणार असल्याची शक्यता वर्तवली. यावरून सोशल मीडियावर चर्चाही झडल्या. अनेकांनी तर धनश्रीचे नाव श्रेयस अय्यरशी जोडले. यातूनच श्रेयस ट्रोल झाला.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्नाचे फोटो शेअर केले होते. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याची माहिती दिली होती. धनश्री वर्मा एक कोरिओग्राफर आहे, तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. लग्नानंतर युझवेंद्र चहलही अनेक व्हिडिओंमध्ये धनश्री वर्मासोबत मस्ती करताना आणि डान्स करताना दिसला. नुकताच युझवेंद्र चहल आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर होता, तेव्हा धनश्रीही त्याच्यासोबत होती. दोघांनीही इन्स्टाग्रामवर सतत त्यांचे अनेक फोटो शेअर केले आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसले.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट एका ऑनलाइन क्लासदरम्यान झाली होती. खरंतर चहलने धनश्री वर्माचा डान्स क्लास जॉईन केला होता, इथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. धनश्री वर्मा डान्स कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट देखील आहे. धनश्री वर्माचे नृत्याशी संबंधित एक यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलचे 26 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
टीम इंडियाचे सर्व स्टार आणि सीनियर खेळाडू सध्या ब्रेकवर आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. या दौ-यानंतर टीम इंडियाला आशिया कप खेळायचा असून या स्पर्धेतील संघात युजवेंद्र चहलचा समावेश करण्यात आला आहे. युझवेंद्र चहलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने टीम इंडियासाठी 67 वनडेमध्ये 118 विकेट घेतल्या आहेत, तर 62 वनडेमध्ये 79 विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 131 सामन्यांमध्ये 166 विकेट घेतल्या आहेत, तो सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. (Yuzvendra Chahal-Dhanashree Verma)