जोकोव्हिचला सिनसिनाटी ओपनमधून बाहेरचा रस्ता | पुढारी

जोकोव्हिचला सिनसिनाटी ओपनमधून बाहेरचा रस्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : तब्बल 21 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचला मोठा झटका बसला आहे. कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला सिनसिनाटी ओपनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नोव्हाकने कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला अमेरिकेला जाता येणार नाही आणि यामुळेच त्याला सिनसिनाटी ओपन हार्डकोर्ड स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तसेच न्यूयॉर्कमध्ये 29 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या अमेरिका ओपनलाही तो मुकणार आहे.

सर्बियाच्या 35 वर्षीय जोकोव्हिचने यापूर्वीच त्याची भूमिका स्पष्ट केली होती. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आपण लस घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. याच कारणामुळे तो जानेवारीत पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये आणि अमेरिकेतील 2 स्पर्धांमध्ये खेळू शकला नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे त्याला मॉन्ट्रियलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेतूनही बाहेर राहावे लागले आहे. कारण, अमेरिका आणि कॅनडामध्ये फक्त त्यांनाच प्रवेश दिला जात आहे, ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे.

नोव्हाक जोकाव्हिच कोरोनाची लस न घेतल्यामुळे यापूर्वी देखील वादात सापडला होता. जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधी देखील कोरोनाची लस घेतली नव्हती, ज्यामुळे त्याला त्यादेखील स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.

Back to top button