ICC T20I Rankings : श्रेयस अय्यरची झेप, सूर्यकुमार दुस-या स्थानी कायम | पुढारी

ICC T20I Rankings : श्रेयस अय्यरची झेप, सूर्यकुमार दुस-या स्थानी कायम

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20I Rankings : भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आयसीसी (ICC) पुरुषांच्या टी 20 (T20I) क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे तर श्रेयस अय्यरने टॉप-20 मध्ये एन्ट्री घेतली आहे. बुधवारी आयसीसीने टी 20 क्रमवारी जाहीर केली. यात सूर्यकुमार 805 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे, तर अय्यर 578 रेटिंग गुणांसह सहा स्थानांची झेप घेत 19व्या स्थानावर पोहचला आहे. अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी-20 मध्ये 40 चेंडूत 64 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या अव्वल स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या यादीत, फिरकीपटू रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांनीही ताज्या टी-20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. 21 वर्षीय बिश्नोईने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यात सहा विकेट घेतल्या होत्या. बिश्नोईने आता 50 स्थानांनी झेप घेत 44व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर अंतिम सामन्यात तीन विकेट घेणार्‍या कुलदीपने 58 स्थानांनी झेप घेत 87 वे स्थान मिळवले आहे. मात्र, भुवनेश्वर कुमारला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो सध्या नवव्या क्रमांकावर आहे. (ICC T20I Rankings)

दक्षिण आफ्रिकेच्या रीझा हेंड्रिक्सने आयर्लंडविरुद्धच्या 2-0 मालिका विजयादरम्यान 74 आणि 42 च्या स्कोअरसह 13व्या स्थानावर पोहोचून टी 20 मध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज गोलंदाजांच्या यादीत 10 स्थानांची झेप घेत 18 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी (क्रमांक 23) आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन (31 क्रमांक) यांनीही क्रमवारीत आपले स्थान सुधारले आहे. (ICC T20I Rankings)

Back to top button