विश्वनाथन आनंद ‘फिडे’चा उपाध्यक्ष | पुढारी

विश्वनाथन आनंद ‘फिडे’चा उपाध्यक्ष

चेन्नई : वृत्तसंस्था : भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या अर्थात फिडेच्या उपाध्यक्षपदी निवडून आला; तर अर्काडी डॉर्व्हिक हे अध्यक्षपदी पुन्हा निवडून आले. पाच वेळा जगज्जेता राहिलेला विश्वनाथन आनंद हा डॉर्व्हिक यांच्या गटाचा प्रतिनिधी होता. डॉर्व्हिक यांच्या गटाला 157 मते मिळाली; तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या अँद्रीई ब्रॅशफोल्टस यांना अवघ्या 16 मतांवर समाधान मानावे लागले.

चेन्नईत सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेदरम्यान फिडे काँग्रेसची ही निवडणूक झाली. बुद्धिबळ खेळाडू म्हणून आपल्या अलौकिक कारकिर्दीत आनंदने असंख्य विजेतेपद मिळवलेली आहे. सध्या खेळाडू म्हणून तो बुद्धिबळपटापासून दूर असला तरी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

ज्युनिअर विश्व अजिंक्यपद

स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर आनंद लहान वयातच भारताचा पहिला ग्रँडमास्टर झाला होता. त्यानंतर एकापाठोपाठ एक शिखर पार केली. 2017 मध्ये तो पाचव्यांदा जागतिक रॅपिड बुद्धिबळचा विश्वविजेता झाला होता. आनंद हा आता फिडेचा उपाध्यक्ष असणार आहे, हे आमच्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. तो माणूस म्हणून फारच ग्रेट आहे. माझा तर तो फार जुना मित्र आहे, असे डॉर्व्हिक यांनी सांगितले.

Back to top button