भाविना पटेलने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. पॅरा टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाविनाने दिमाखदार कामगिरी केली आणि भारताला शनिवारी रात्री उशिरा चौथे सुवर्णपदक जिंकून दिले.
त्यापूर्वी शनिवारी भारताला रवी दाहिया, विनेश फोगट आणि नवीन यांनी सुवर्णपदके जिंकून दिली होती. या तिघांनीही कुस्तीमध्ये सोनेरी यश मिळवले होते, पण भाविनाने पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालत इतिहास रचला आहे.
भाविना पटेलने इतिहास रचला आणि नायजेरियाच्या इफेचुकवुडे क्रिस्तियाना इक्पेओयीवर 12-10, 11-2, 11-9 असा विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले.