पणजी : फिफा विश्‍वचषकासाठी तिकीट विक्री सुरू | पुढारी

पणजी : फिफा विश्‍वचषकासाठी तिकीट विक्री सुरू

पणजी; पुढारी वृत्तसेवा : 17 वर्षांखालील मुलींच्या फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली आहे. स्पर्धेमध्ये एकूण 16 देशांचे संघ 32 सामने खेळणार आहेत. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर स्पर्धेतील सोळा सामने खेळविण्यात येणार आहेत. यामध्ये दोन उपांत्यपूर्व व दोन उपांत्य फेरीच्या सामन्यांचा समावेश आहे.

राज्यातील सर्व 16 सामन्यांच्या तिकिटांसाठी विशेष पॅकेज करण्यात आले असून यासाठी मैदानावरील दोन ब्लॉक राखीव ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण पॅकेजचा तिकीट दर 560 आणि 1120 रुपये आहे. एका दिवसातील सामन्यांसाठी तिकीट दर 80 आणि 160 रुपये असा माफक ठेवण्यात आला आहे. या तिकिटात दिवसभरातील चार सामने पाहता येतील.

नवी मुंबई येथील सामन्यांसाठी पॅकेज तिकीट दर 350 आणि 700 रुपये आहे. भुवनेश्वरमध्ये होणार्‍या समान्यांसाठी पॅकेज दर 210 आणि 420 रुपये आहे. एका व्यक्तीला किमान एक व कमाल दहा तिकिटे खरेदी करता येणार आहेत.

कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र सक्‍तीचे

स्टेडियमवर प्रवेश करण्यासाठी कोव्हिडचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रही आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय तिकीट धारकाला स्वतःचे ओळखपत्र दाखविणेही आवश्यक आहे.

Back to top button