CWG 2022 : अन्नू राणीने भालाफेकीत पटकावले कांस्यपदक, भारताची एकूण पदकसंख्या ४७ वर | पुढारी

CWG 2022 : अन्नू राणीने भालाफेकीत पटकावले कांस्यपदक, भारताची एकूण पदकसंख्या ४७ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राष्‍ट्रकूल स्‍पर्धेतील  महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या अन्नू राणीने कांस्यपदक पटकावले. तिचा सर्वोत्तम प्रयत्न ६० मीटरचा होता. ऑस्ट्रेलियाच्या केल्सीने भाला 64 मीटर लांब फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. राष्ट्रकुल 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 47 पदके जिंकली आहेत. यामध्ये 16 सुवर्ण, 12 रौप्य आणि 19 कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारताचे पदक विजेते

१६ सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी) ), नीतू गंघास, अमित पंघल, एल्‍डेहाेस पॉल

१६ रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर

१९ कांस्य : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोका, रोहित टोका, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी

Back to top button