भारतीय महिला हॉकी संघाची बर्मिंगहममध्‍ये डंका, कांस्य पदकावर मोहर; तब्‍बल १६ वर्षानंतर भारताने पदकाला गवसणी | पुढारी

भारतीय महिला हॉकी संघाची बर्मिंगहममध्‍ये डंका, कांस्य पदकावर मोहर; तब्‍बल १६ वर्षानंतर भारताने पदकाला गवसणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कांस्य पदकासाठी भारत आणि न्यूझीलँडमध्ये आज सामना झाला. यामध्ये भारताने न्यूझीलँडवर विजय मिळवत कांस्य पदकावर मोहर उमटवली. भारतीय हॉकी संघाची कर्णधार सविता पुनिया हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने
भारतीय हॉकी संघाने २००६ पासून राष्ट्रकुलमध्ये एकही पदकावर मोहर उमटवली नव्‍हती.  यापूर्वी २००२ मध्ये सुवर्ण तर २००६ मध्ये रजत पदकावर मोहर उमटवली आहे. तब्‍बल १६ वर्षानंतर भारताने पदकाला गवसणी घातली आहे.

सविता पुनियाने विजयाची शिल्‍पकार

अत्यंत अटीतटीच्या सामन्यात भारतीय हॉकी महिला संघाने न्युझिलॅंडवर मात केली. पेनल्टी शुटआऊट वर गेलेला हा सामना भारताने जिंकला.  न्‍यूझीलंडने पेनल्‍टी शूटआउटमध्‍ये आघाडी घेतली. मात्र  सविता पुनियाने न्युझीलॅंडचा चार पेनल्‍टी शूटआउट रोखले.

भारतीय संघाने मॅचची सुरुवात आक्रमक होती. पहिल्या मिनिटातच गोलसाठी प्रयत्न करत होते. न्यूझिलँडला पहिल्या १० मिनिटात पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण गोल मिळाला नाही. ११ व्या मिनिटात भारताच्या संगीता कुमारी गोलपोस्टच्या जवळ पोहोचली होती. पण तिला गोल करता आला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. न्यूझीलंडने २७ व्या मिनीटात शानदार खेळ सुरु केला. पण गोल करता आला नाही. भारतीय संघाने गोलपोस्टच्या जवळ जावूनही गोल करता आला नाही. भारताच्या सलिमा टेटेने २९ व्या मिनिटात गोल केला. शर्मिला गोलपोस्टच्या जवळ जाऊनही गोल करता आला नाही. पण सलिमाने गोल केला.

Back to top button