

भारतीय पुरुष हॉकी संघाने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांच्या गट 'ब' सामन्यात घानाचा 11-0 असा पराभव केला. उपकर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक तीन गोल केले.
हा भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगचा 300 वा आणि उपकर्णधार हरमनप्रीत सिंगचा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. भारताच्या गटात घाना व्यतिरिक्त इंग्लंड, वेल्स आणि कॅनडाचे संघ आहेत. घानानंतर भारताचा पुढील सामना सोमवारी यजमान इंग्लंडशी होणार आहे. यानंतर भारतीय संघ 3 ऑगस्टला कॅनडा आणि 4 ऑगस्टला वेल्सशी भिडणार आहे.